आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिचडी खाण्याचे 7 आरोग्य फायदे, कदाचित तुम्हाला माहिती नसतील...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खिचडी एक प्रसिध्द पदार्थ आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून हा पदार्थ तयार केला जातो. यामध्ये भाज्या, मसाले, तुप या सर्वांचा चवीनुसार वापर केला जातो. खिचडीला नॅशनल फूड बनवावे अशी चर्चा सोशल मिडियावर होती. परंतु फूड प्रोसेसिंग मिनिस्टर हरसिमरत कौर बादल यांनी स्पष्ट केले की, दिल्लीमध्ये होणा-या वर्ल्ड फूड इंडिया कॉन्फ्रेंसमध्ये खिडचीला ब्रांड फूडच्या स्वरुपात प्रमोट केले जाईल. खिचडीला नॅशनल फूड बनवण्याचा सध्या काहीच विचार नाही.

कुठे होणार वर्ल्ड रेकॉर्ड
दिल्लीमध्ये होणा-या वर्ल्ड फूड इंडिया कॉन्फ्रेंसमध्ये 4 नोव्हेंबरला 800 किलो खिचडी शिजवून वर्ल्ड  रेकॉर्ड बनवला जाईल. भारतातील प्रसिध्द शेफ संजीव कपूर आपल्या सहका-यांसोबत ही खिचडी बनवतील. ही खिचडी कॉन्फ्रेंसमध्ये आलेल्या देश-विदेशातील अतिथी आणि अनाथ मुलांना दिली जाईल.
 
कोणत्या भांड्यात शिजवणार ही खिचडी?  Largest Khichdi Pan for World Records
World Food India कॉन्फ्रेंसमध्ये 1000 लिटर क्षमता असणारा आणि 7 फूट डायमीटर पॅन तयार केला आहे.  यामध्ये शेफ संजीव कपूर खिचडी शिजवणार आहेत.

भारतातील खिचडीचा इतिहास काय?
खिचडीला भारतातील स्टेपल फूड म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक वर्षांपासून भारतात खिचडी खाल्ली जाते आहे. मकर संक्रांतीला खिचडीचे विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, गोरखपुरमध्ये गुरु गोरखनाथने महादेवाला खिचडीचा प्रसाद अर्पण केला होता. गुरु गोरखनाथने आपले शिष्य आणि योग्यांना शत्रूंशी युध्द करताना तंदुरुस्त राहण्यासाठी खिचडी खायला दिली होती. तेव्हापासून गोरखुपरमध्ये मकरसंक्रांतीला खिचडीची यात्रा भरते.
 
संस्कृतमधून आला खिचडी हा शब्द
खिचडी हा शब्द संस्कृत शब्द 'खिच्चा' या शब्दातून आला असे म्हटले जाते. मुगलकाळात खिचडी खुप प्रसिध्द डिश होती. 16 व्या शतकामध्ये मुगल बादशहा अकबर वजीर अबुल फजलने लिहिलेल्या दस्तऐवजात विविध प्रकारे खिचडी बनवण्याची रेसिपीचा उल्लेख आहे.

भारत नाही तर विदेशातही प्रसिध्द आहे खिचडी
भारतासोबतच मध्य पूर्व देश, अनेक आफ्रीकन कंट्रीज, मोरक्को, इजिप्त सारख्या देशांमध्ये खिचडी खुप प्रसिध्द आहे. येथे विविध पध्दतींनी खिचडी बनवली जाते. खिचडीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. या देशांमध्ये खिचडीमध्ये मीट मिसळले जाते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या खिचडी खाण्याचे फायदे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...