Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | international yoga day suryanamaskar information in marathi

योग दिवस : सूर्यनमस्‍कार 12 स्‍टेप्‍स, फायद्यांसह वाचा कोणी टाळावा हा व्‍यायाम

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 21, 2017, 07:03 AM IST

देशभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला योगामधील सर्वात खास व्यायाम सूर्यनमस्कार संदर्भात खास माहिती देत आहोत.

 • international yoga day suryanamaskar information in marathi
  देशभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला योगामधील सर्वात खास व्यायाम सूर्यनमस्कार संदर्भात खास माहिती देत आहोत.

  सूर्यनमस्कार हा 12 आसनांचा एक एकत्रित व्यायामप्रकार आहे. दररोज सकाळी सुर्योदयाच्या वेळेस सूर्यनमस्कार केल्याने दिवसाची प्रसन्न सुरवात तर होतेच शिवाय शरीर निरोगी राहण्यासही मदत होते. सूर्यनमस्कारात क्रमाने केली जाणारी 12 आसने, आपल्‍या शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास तसेच ताणतणाव कमी करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त सूर्यनमस्‍काराचे इतरही फायदे आहेत.

  पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, सूर्यनमस्‍काराची 12 आसनं आणि वाचा कोणी टाळावा हा व्‍यायाम...

 • international yoga day suryanamaskar information in marathi
  शरीराचे स्वास्थ्य सुधारते-सूर्यनमस्कार ही 12 आसनांची मालिका आहे. ज्‍यांना व्‍यायामासाठी खास वेळ काढता येत नाही त्‍यांच्‍यासाठी हा एक परिपूर्ण व्‍यायाम आहे. नियमित सूर्यनमस्कार केल्याने शरीर व मन निरोगी राहते.
 • international yoga day suryanamaskar information in marathi
  पचनशक्ती- सूर्यनमस्कार करताना पोटाजवळील स्नायूंवर ताण येत असल्‍यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन असे पचनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी सकाळी नियमित रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार करावेत. त्‍यामुळे पचनाचे विकार दूर होतील.
 • international yoga day suryanamaskar information in marathi
  पोटाजवळील चरबी कमी -सूर्यनमस्कारामुळे पोटाजवळील स्नायूंचा व्यायाम होतो. नेहमीच्या वर्कआऊट सोबतच सूर्यनमस्कार केल्याने पोटाजवळील चरबी कमी होण्यास मदत होते.
 • international yoga day suryanamaskar information in marathi
  रक्त शुद्धीकरण होते-सूर्यनमस्कार करताना सतत दीर्घश्वसन केल्याने व उच्छश्वास बाहेर सोडल्याने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे रक्त शुद्धीकरण होते. तसेच शरीरातील कार्बन डायऑक्साईड व विषारी वायू बाहेर पडण्यास मदत होते.
 • international yoga day suryanamaskar information in marathi
  स्मरणशक्ती सुधारते-सूर्यनमस्कारामुळे स्मरणशक्ती सुधारते व मज्जासंस्था शांत राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारल्याने मनाची अस्थिरता कमी होण्यास मदत होते.
 • international yoga day suryanamaskar information in marathi
  लवचिकता वाढते-  सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम असल्याने तो नियमित केल्यास शरीर निरोगी व लवचिक बनते.
 • international yoga day suryanamaskar information in marathi
  मासिक पाळीचे चक्र सुधारते-अनियमित मासिकपाळीची समस्या असलेल्या स्त्रियांनी नियमित सूर्यनमस्कार केल्यास या समस्येतून आराम मिळतो. तसेच सूर्यनमस्कारामुळे गर्भारपणानंतर प्रसुती सुलभ होण्यास मदत होते.
 • international yoga day suryanamaskar information in marathi
  तरूण राहण्यास मदत-सूर्यनमस्कारामुळे त्वचेची कांती सुधारते तसेच वृद्धपकाळात चेहर्‍यावर पडणार्‍या सुरकुत्यांपासून सुटका होते. या व्यायामप्रकारामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो परिणामी सौंदर्य सुधारण्यास मदत होते
 • international yoga day suryanamaskar information in marathi
  वजन घटवण्यास मदत -झटपट वजन घटवण्याचा मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीराचा कार्डीओ व्हसक्युलर प्रमाणेच व्यायाम होतो व वजन कमी होण्यास मदत होते. पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
 • international yoga day suryanamaskar information in marathi
  कोणी टाळावा हा व्‍यायाम..
  गर्भवती स्त्रिया– गर्भारपणातील पहिल्या तीन महिन्यांनंतर गर्भवती स्त्रीने सूर्यनमस्कार करणे टाळायला हवे.  हर्नियाग्रस्त किंवा उच्चरक्तदाबाची समस्या असलेल्यांनी सूर्यनमस्कार करू नये.
 • international yoga day suryanamaskar information in marathi
  मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रिया तसेच मुलींनी सूर्यनमस्कार टाळावा. पाठदुखीची समस्या असलेल्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे जरूरीचे आहे.
 • international yoga day suryanamaskar information in marathi

Trending