आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप ‘टिप्स’: चिमुकल्यांचा सर्दी-ताप अन‌् पालकांची काळजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुले खेळता-खेळता रडू लागतात... त्यानंतर त्यांची कुरकूर सुरूच रहाते. ते का कुरकुरतात बरेच वेळा कळत नाही... मग त्यांचे नाक वहायला लागते, ताप येतो... याच वेळी त्यांचे अंगही कसकसत असते... पण ते लहान असल्याने त्यांना हे सांगता येत नाही. म्हणून मग पालकांनाही या गोष्टी फारशा कळत नाहीत. अशा वेळी तत्काळ डॉक्टरकडे मुलांना तपासणीसाठी न्यावेच, पण काही प्रथमोपचारही असतात किंवा त्यांना सर्दी, ताप, खोकला या गोष्टी कशामुळे होतात हेदेखील समजून घेतले पाहिजे. डॉ. नितिन मेहेरकर याविषयी सविस्तर सांगत आहेत...
बाळाला औषधे लिहून दिल्यावर ३-४ प्रश्न आता नित्याचेच झाले आहेत. डॉक्टर यात सर्दी, खोकला आणि तापाचे औषध कोणते आहे? पुढच्या वेळी असाच त्रास झाला, तर हे औषध चालेल ना? प्रथमोचार म्हणजे सुरुवारीला केले जाणारे उपचार. लहान बाळांमध्ये विशेषतः तीन महिन्यांपेक्षा रहाणे योग्य नाही. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते घातक ठरू शकते. कारण अशा बाळांमध्ये कसल्याही पूर्वसूचनेशिवाय त्यांची प्रकृती ढासळण्याचा धोका असतो. मोठ्या बाळांमध्ये मुलांमध्ये मात्र, जर त्यांच्या लघवीचे प्रमाण आणि वागणूक नेहमीसारखी असेल, तर आपण प्रथमोपचारावर विसंबून राहू शकतो. पण त्याचवेळी त्यांच्या आजारावर बारीक लक्ष असणे आवश्यक असते. जर दाेन दिवसांपेक्षा जास्त दिवस आजारांची लक्षणे कायम राहिली, तर डॉक्टरांच्या मदतीने योग्य निदान करणे जरुरी असते. ताप, अंगदुखी, साधी जखम अशा दुखण्यापासून आराम देणारी औषधे बालकाच्या प्रथमोपचारासाठी घरी ठेवावेत.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सर्दी-खोकला झाल्यावर लहानमुलांवर कसे करावे उपचार...
 
बातम्या आणखी आहेत...