आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात तर, करा हे घरगुती सोपे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज शहरी माणसाला पदूषणाच्या वातावरणातच रहावे लागते. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. डोळे कमजोर होणे. केस पांढरे होणे. केस गळणे, अशा समस्या रोजच्याच झाल्या आहेत.

 

आज बहुतेक लोकांना डँड्रफच्या समस्येला सामोरे जावे लागते. केसातील कोंडा दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात, मात्र शांपू वापरणे बंद केले की कोंडा पुन्हा येतो. कोंडा आपल्या डोक्यातील मृत पेशींपासून बनतो. वातदोषामुळेही कोंडा तयार होतो. यामुळे खाज सुटते आणि केस गळतात. या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय येथे देत आहोत.

 

1. खोबरेल तेलात कापूर मिसळून चांगल्या रीतेने केसांना लावा. थोडयाच दिवसात कोंडा निघून जाईल.
2. लिंबाचा रस केसांना लावा आणि थोड्या वेळाने केस धुवून घ्या.
3. खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावा.
4. दह्याने केस धुवून घ्या. हे सारे उपाय साधे सोपे असले तरी प्रभावी आहेत.

बातम्या आणखी आहेत...