आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World diabetes day: टाइप 1 डायबिटिजच्या रुग्णांसाठी वरदान ठरतेय उडान संस्था...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज वर्ल्ड डायबिटीज डे आहे. या निमित्ताने आपण टाइप 1 डायबिटीजच्या गरीब मुलांना मोफत उपचार देणा-या उडान या संस्थेविषयी जाणून घेणार आहोत. उडान या संस्थेमार्फत टाइप 1 डायबिटीज असणा-या मुलांना मोफत उपचार दिले जातात. 2002 पासून ही संस्था औरंगाबादमध्ये काम करते आहे. प्रख्यात डायबिटोलॉजिस्ट डॉ. अर्चना सारडा यांनी ही संस्था सुरु केली. आज या संस्थेत 540 गरीब मुलांना मोफत उपचार दिले जात आहे.
 
कसा सुरु झाला प्रवास
डॉ. अर्चना सारडा यांनी सांगितले की, 2002 मध्ये त्यांच्याकडे टाइप 1 डायबिटीजची रुग्ण असलेले 13 वर्षांची मुलगी आली. या लहान मुलीवर उपचार करण्यासाठी तिच्या पालकांकडे पैसेही नव्हते. तिची आणि तिच्या पालकांची अवस्था पाहून डॉ. अर्चना यांनी त्या मुलीचा मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अशीच गरीब मुलं त्यांच्याशी जोडली गेली. या मुलांची संख्या वाढल्यावर त्यांनी उडान नावाची संस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि आज या संस्थेत 540 गरीब मुलं मोफत उपचार घेत आहेत. 2 महिन्यांच्या बाळापासून तर मोठी मुलंही येथे उपचार घेत आहेत. या संस्थेत ग्रामीण भागातील 70 टक्के आणि शहरी भागातील 30 टक्के मुलं गरीब मुलं उपचार घेत आहेत.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या संस्थेविषयी सविस्तर माहिती... मुलांना कसे दिले जाते प्रशिक्षण,  एमर्जन्सी हेल्प लाइन, पालकांना प्रशिक्षण...
 
बातम्या आणखी आहेत...