अनेकवेळा असे दिसून येते की, रस्त्यावरून जात असताना मांजर आडवी गेल्यास लोक त्या रस्त्यावरून पुढे जाण्यास घाबरतात. त्याच रस्यावर एखादा दुसरा व्यक्ती
आपल्या समोरून निघून जातो परंतु त्याच्यासोबत काहीच वाईट घडत नाही, असे का? काय कारण आहे की, मांजर आडवी गेलेल्या रस्त्याचा वाईट प्रभाव त्या व्यक्तीवर पडलेला दिसत नाही.
यामागचे कारण असे आहे की मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली आहे, डाव्या की उजव्या. या गोष्टीवर मांजर आडवी गेल्याचे शुभ किंवा अशुभ फळ अवलंबून असते. शकुन शास्त्रानुसार मांजर डाव्या बाजूने आडवी जाणे अशुभ मानले जात नाही. परंतु मांजर उजव्या बाजूने आडवी गेली असेल तर अशुभ मानले जाते. जर मांजर उजव्या बाजूने आडवी गेली असेल तर निश्चितच समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी ती डावी बाजू असेल. यामुळे समोरून येणाऱ्या व्यक्तीला त्या रस्त्यावरून गेल्याने कोणत्याच प्रकारचे अशुभ फळ प्राप्त होत नाहीत.
यामुळे जेव्हाही मांजर उजव्या बाजूने आडवी जाईल त्यावेळी समोरून एखादा व्यक्ती जाण्याची वाट पाहावी. मांजर आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूने गेली हे पाहू नये.
पुढील स्लाईड्सवर वाचा...
जर मांजरीने गुपचूप घरातील दुध पिले तर काय होते...
मांजरीचा पंजा डोक्याला लागला तर काय होते..
झोपताना मांजर अंगावर पडली तर काये होते...
प्रवासाला निघाल्यानंतर मांजर दिसली तर काय होते...
घरामध्ये मांजर रडत असेल तर काय होते...