आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ! फळातील विषारी द्रव्‍यामुळे होऊ शकतो कावीळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्बाईड नावाच्या विषारी रसायनाचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले फळे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. अशा विषारी फळातून प्रोटिन मिळण्याऐवजी शरीरात विष सोडले जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या रसायनाचा बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. केळी, आंबा, चिकू व संत्री ही फळे सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. पिवळ्या रंगाची टवटवीत दिसणारी ही फळे नागरिक मोठ्या उत्साहात खरेदी करतात. कृत्रिमपणे पिकविलेल्या या फळांना नैसर्गिक गोडी नसते. मात्र, या फळांमधून आपण विष खात असल्याचे अनेक नागरिकांना माहीतही नसते. बाजारपेठेत अशा फळांची दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. रसायनाचा वापर करून पिकवण्‍यात आलेली फळे आहारात घेतली तर, या रसायनाचा परिणाम लीव्‍हरवर होतो. या रसायनामुळे कावीळा सारखा आजर जोर पकडत असल्‍याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ आशु ग्रोवर यांनी सांगितले.
ते म्‍हणाले की, लहान मुलांना घाण पाण्‍यामुळे कावीळ होतो. अगदी याच प्रकारे रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली फळे आहारात घेतल्‍यामुळे कावीळ होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या बरोबराच घराच्‍या आजूबाजूला साचलेली घान, दूषित पाणी, सिगारेट, मसाल्‍याच्‍या पदार्थाचे प्रमाण आहारात वाढल्‍यानंतर कावीळ होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. कावीळ झाल्‍यांनतर उपचार तात्‍काळ केला नाही तर, लीव्‍हर ट्रान्‍सप्‍लांट करण्‍याची वेळ येते. अशी माहिती ग्रोवर यांनी दिली.