आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदी जीवनासाठी या दहा गोष्टींपासून कायम दूर राहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकटेपणाने जगणे
आयुष्यात जोडीदाराचा शोध घेणे कदाचित कठीण असू शकेल पण एकटे राहणे आरोग्यासाठी योग्य नाही. एका संशोधनानुसार एकटेपणामुळे आयुष्यात 10 वर्षांनी घट होत असते.
दररोज तासंतास बसून राहणे
जर एका दिवसात सलग तीन तासांपेक्षा जास्त वेळ आपण बसून राहिलो तर आयुष्य दोन वर्षानी कमी होऊ शकते.एका ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या ऑस्ट्रेलियन संशोधकाच्या शोधात म्हटल्याप्रमाणे दररोज कसरत करूनही या कमतरतेची भरपाई केली जाऊ शकत नाही.
मित्रांची कमतरता असणे
ज्यांचा सामाजिक संपर्क कमी असतो अशा लोकांचा मृत्यूदर ज्यांचा संपर्क उत्तम असतो अशांच्या तुलनेत अधिक असतो. ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना,चॅपल हिल यांच्या संशोधनानुसार, मित्र आणि आप्तेष्टांपासून दूर राहणे आरोग्यासाठी तेवढेच घातक असते जेवढे दर 15 मिनिटांनी एक सिगारेट ओढणे हानिकारक असते.
जास्त वेळ टीव्ही बघणे
हार्वर्डच्या संशोधकांनुसार दररोज दोन तासांपेक्षा अधिक काळ टीव्ही बघण्याने हृदयविकारासह टाइप 2 प्रकारचा मधुमेह होण्याची भीती असते.25 वर्षे वयानंतर जर कुणी दररोज दोन तासांपेक्षा अधिक टीव्ही बघत असेल तर आयुष्य 21.8 मिनिटांनी कमी होऊ शकते.
अहितकारक पदार्थांचे सेवन
हृदयविकाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे टेक्सासपासून व्हर्जिनियापर्यंतच्या परिसराला ‘स्ट्रोक बेल्ट’ म्हटले जाते. संशोधनानुसार, अहितकारक पदार्थांचे सेवन हे यामागील प्रमुख कारण आहे.
सहकार्‍यांशी भांडणे
सहकर्‍यांशी वर्तन चांगले नसण्याचा सरळ अर्थ असा होतो की, आयुष्य कमी करणे. तेल अवीव येथील युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांशी संबंध चांगले नसतील तर त्यामुळे ताण वाढतो आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
कामच न करणे
बेरोजगारीमुळेही आयुष्य कमी होण्याचा धोका असतो. कॅनडातील संशोधकांनुसार 15 देशातील दोन कोटी बेरोजगार लोकांचा 40 वर्षे अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अन्य एका संशोधनातही अधिक मृत्युदराचा संबंध धूम्रपान व बेरोजगारीशी असल्याचे म्हटले आहे.
मृत्यूची भीती सतावणे
ही एक वेदनादायक भीती आहे. ही भीती मनात घर करून राहिली तर आयुष्य कमी होऊ लागते. यू एस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीननुसार कॅन्सरच्या रुग्णांचे अध्ययन करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.2012 मध्ये प्रसिद्ध केलेल्या
या शोधात म्हटले आहे की आयुष्याचा संबंध रुग्णांमधील मृत्यूच्या भीतीशी असल्याचे दिसून आले आहे.
अपूर्ण झोप
जर कुणी दररोज पाच तासांपेक्षा कमी किंवा नऊ तासांपेक्षा अधिक झोपत असेल तर आयुष्य कमी होत असते.हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार आरोग्यासाठी साडेसात तासांची झोप पुरेशी आहे. जास्त झोप कमी झोप घेण्याएवढेच हानिकारक ठरणारे असते.
दीर्घ प्रवास करणे
लांबचे प्रवास वारंवार करण्याने तणाव वाढतो. लांबच्या प्रवासांमुळे आरोग्याशाी संबंधित गोष्टींवर गंभीर परिणाम होतात. स्वीडनच्या उमिया युनिव्हर्सिटीने एका संशोधनातून हा निष्कर्ष काढला आहे.