आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If You See Today S Moon Will Not Blame It On You

आज चंद्र पाहिल्यास लागणार नाही तुम्हाला हा दोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये विविध मान्यता आणि प्रथा प्रचलित आहेत. काही प्रथा सण-उत्सवाशी संबंधित आहेत. अशीच एक मान्यता गणेश चतुर्थी (29 ऑगस्ट, शुक्रवार) उत्सवाशी संबंधित आहे. एका मान्यतेनुसार जर एखादा व्यक्तीने गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्राचे दर्शन घेतले तर त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप लागतो.
उज्जैनचे पं. श्यामनारायण व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर गणेश चतुर्थीच्या अगोदर येणारी द्वितीया तिथी (27 ऑगस्ट, बुधवार)ला चंद्राचे दर्शन घेतल्यास चतुर्थी तिथीला चंद्र दर्शनाचा दोष लागत नाही. या मान्यतेशी संबंधित एक कथा प्रचलित आहे. या कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्राचे दर्शन घेतले होते. यामुळे त्यांच्यावर स्मयंतक मणी चोरल्याचा आरोप लावण्यात आला होता. या मान्यतेमागे तसे काही ठोस कारण नाही, परंतु तरीही हिंदू धर्मावलंबी या गोष्टीकडे विशेष लक्ष देतात आणि चतुर्थीच्या रात्री चंद्राचे दर्शन करत नाहीत.