आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणांमुळे अक्षय्य तृतीया तिथी मानली जाते खास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नवीन कार्याची सुरूवात करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेला दैवी तिथी देखील म्हंटले जाते. अक्षय्य या शब्दाचा अर्थ आहे क्षय न होणे. धार्मिक दृष्टीकोनातूनही ईश्वराला अक्षय्य,अनादी, अनंत मानले गेले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जप, तप, दान, धर्म केल्याने पुण्य वाढते. जाणुन घ्या कसे...

- अक्षय्य तृतीयेपासूनच त्रेत्रायुगाचा प्रारंभ झाला होता. त्यामुळेच या दिवसाला युगादी तृतीया म्हटले जाते.
-विष्णुचा अवतार असलेल्या श्रीपरशुरामाचा जन्म देखील याच दिवशी झाला होता. त्यामुळे हा दिवस परशुराम तिथी म्हणुन देखील ओळखला जातो.
- याच दिवशी विष्णु ह्रग्रीव रूपात अवतरले होते.
- याच शुभ मुहूर्तावर विष्णुंनी नर-नारायणाच्या रूपात अवतार घेतला होता.
- श्री बद्रीनारायणाचे पट याच दिवशी उघडले जातात.
-वृदावनातील श्री बांकेबिहारींच्या पादुकांचे दर्शन केवळ याच दिवशी दिले जाते.
- वैशाख महिना भक्तीचा महिना असल्याने या दिवशी विष्णुदेवासोबत महालक्ष्मीची देखील उपासना केल्याने सुख,शांती, आणि वैभव प्राप्त होण्यास मदत होते.