आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Know The Type And Importance Of Rudraksh, These Things Are Written In Shivmahapuran.

हे रूद्राक्ष धारण केल्‍याने कधीच जाणवणार नाही पैशाची चणचण; जाणून घ्‍या रोचक गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदूधर्मशास्त्रात रूद्राक्षाला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले आहे. भगवान शंकराचे प्रत‍िक म्हणून रुद्राक्ष धारण केले जाते. भोळ्या शंकराचा नेहमी कृपाशिर्वाद असावा म्हणून भक्‍त रुद्राक्षाच्या माळा गळ्यात परिधान करतात.

शिव शंकराच्‍या डोळ्यातून पडलेला अश्रुचा थेंब म्‍हणजे रूद्राक्ष, असे पुराणामध्‍ये सांगण्‍यात आले आहे. या संदर्भात पुराणात एक कथा प्रचलीत आहे, एकदा भगवान शंकराने सृष्‍टीच्‍या कल्‍याणासाठी शेकडो वर्षे तपश्चर्या केली. मात्र या दरम्यान, शिव शंकराच्‍या डोळ्यातून अश्रु पडला, तिथे रूद्राक्ष वृक्षाची निर्मिती झाली. शिवमहापुराणात विद्येश्वरसंहितेमध्‍ये रूद्राक्षाचे 14 प्रकार सांगण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक रूद्राक्षाचे महत्‍व वेग-वेगळे आहे. त्‍याचे परिमान वेगवेगळे आहेत. त्‍यामुळे तुम्‍ही कोणत्‍या फळासाठी कोणता रूद्राक्ष वापरता हे महत्‍वाचे ठरते. महाशिवरात्रीच्‍या दिवशी पुजा-पाट करूण रूद्राक्ष गळ्यामध्‍ये घातला तर मनोकामणा पूर्ण होतील.
रूद्राक्षाचे प्रकार आणि मंत्र
1- एक मुखी रूद्राक्षामध्‍ये साक्षात भगवान महादेव वसलेले आहेत असे म्‍हटले जाते. जो एक मुखी रूद्राक्ष सोबत ठेवील त्‍याच्‍या घरात नेहमी लक्ष्‍मी खेळती राहिल व त्‍याच्‍या घरात गरिबी येणार नाही.
रूद्राक्षाचा मंत्र- ऊँ ह्रीं नम:
2- दोन मुखी रूद्राक्षाला देवदेवेश्वर म्‍हटले जाते. व्‍यक्तिच्‍या सर्व मनोकामणा पूर्ण करण्‍यासाठी हा रूद्राक्ष महत्‍वाचा ठरतो, असे पुराणात म्‍हटले आहे.
रूद्राक्षाचा मंत्र- ऊँ नम:
कोणता रूद्राक्ष वापरल्‍याने काय लाभ होणार; वाचा पुढील स्‍लाईडवर