कोणत्याही पूजेचा प्रारंभ स्वास्तिक काढून केला जातो. स्वास्तिक चमत्कारी प्रभावाने पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. घराच्या मुख्य प्रवेशव्दारावरसुध्दा स्वास्तिकचे काढण्याची परंपरा आहे. स्वास्तिकासह शुभ-लाभ असेही लिहीले जाते. या परंपरेमुळे अनेक सकारात्मक फळ प्राप्त होतात.
शास्त्रानुसार, श्रीगणेशा प्रथम पूज्यनीय देवता असून स्वास्तिक आणि शुभ-लाभ त्यांचे प्रतिक चिन्ह आहेत. शुभ आणि क्षेम दोन्ही गणेशजींचे पुत्र मानले गेले आहेत. जे काम शुभ आहे त्यात लाभ होतोच म्हणजे फायदा मिळतो. ज्या कामात लाभ मिळतो ते काम शुभ असते. प्रत्येक काम शुभ आणि लाभ असावे या श्रध्देने स्वास्तिकाच्या बाजूला शुभ-लाभ लिहीले जाते.
वास्तु शास्त्रानुसार असे मानले जाते, की घराच्या मुख्य प्रवेशव्दारावर स्वास्तिकासह शुभ-लाभ लिहील्यास घरात नेहमी सुख-शांति असते. अशा घरात लक्ष्मीची विशेष कृपा असते. तसेच आर्थिकतंगी जाणवत नाही.
स्वास्तिकसोबत शुभ-लाभचे चिन्ह साकारात्मकतेचे प्रतिक आहे. त्यामुळे आपल्या आसपास असलेली नकारात्मक उर्जा नष्ट होते. त्यामुळे कोणत्याही शुभकार्यात किंवा सण असल्यास घराच्या मुख्य प्रवेशव्दारावर शुभ-लाभ लिहीले जाते. असे केल्यास घराला वाईट दृष्ट लागत नाही.