आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेश स्थापनेपूर्वी आणि नतंर या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वांच्या आवडत्या गणरायाचे आज घरोघरी आगमन होत आहे. श्रीगणेशाची दहा दिवस प्रत्येक घरात मनोभावे पूजा केली जाते. श्रीगणेश स्थापना व पूजन करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. येथे जाणून घ्या कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

- ज्याठिकाणी श्रीगणेशाची स्थापना करावयाची आहे, ते स्थान दररोज स्वच्छ करावे. तेथे कोणत्याही प्रकारचा कचरा होऊ देऊ नका.

- श्रीगणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी. गणेशाच्या मूर्तीचे मुख पश्चिमेकडे असेल अशाप्रकारे स्थापना करावी.

- श्रीगणेशाची दहा दिवस दररोज पूजा करा. सकाळ-संध्याकाळ नैवेद्य दाखवून आरती करा.

- धर्म ग्रंथानुसार श्रीगणेशाला तुळस अर्पण करू नये.

- श्रीगणेश मूर्ती स्थापना स्थळावर मृतात्म्यांचे चीत्र लावू नये.

- स्थापना स्थळाच्या वर कोणत्याही प्रकरचे जड, व्यर्थ सामान ठेवू नये.

- दुर्वा आणि फुलं दररोज ताजी असावीत.

- स्थापना स्थळावर पवित्रातेकडे विशेष लक्ष द्यावे. चप्पल घालून, चामड्याच्या वस्तू बेल्ट, पाकीट, पर्स घेऊन मूर्ती स्थापित ठिकाणी जाऊ नये.

- कोणत्याही प्रकराची नशा करून स्थापना स्थळावर जाऊ नये.

- एकदा मूर्तीची स्थापना केल्यानंतर पुन्हा मूर्ती इतर ठिकाणी हलवू नये.

- स्थापन स्थळावर बसून दररोज धर्म ग्रंथाचे पाठ केल्यास शुभफळ प्राप्त होतील.