आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र जपाच्या माळेमध्ये 108 मणीच का असतात यामागचे हे आहे गणित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण ज्या माळेने जप करतो त्या माळेमध्ये किती मणी असतात, हे तुम्हाला माहिती आहे का ? जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक, किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते. येथे जाणून घ्या, या संख्येशी निगडीत गणित...

माळेचा एक-एक मणी सूर्याच्या एक-एक कलेचे प्रतिक आहे
एका मान्यतेनुसार माळेमधील 108 मणी आणि सूर्याच्या कलांचा घनिष्ठ संबंध आहे. एक वर्षामध्ये सूर्य 21600 कला बदलतो. सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो. सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन. अशाप्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये 10800 वेळेस कला बदलतो.

याच 10800 संख्येमधील शेवटचे तीन शून्य काढून माळेमध्ये 108 मण्यांची संख्या निश्चित केली आहे. माळेचा एक-एक मणी सूर्याच्या कलेचे प्रतिक आहे. सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहेत. सूर्यदेवच व्यक्तीला तेजस्वी बनवतात तसेच समाजात मान-सन्मान प्राप्त करून देतात. याच कारणामुळे सुर्य कलांच्या आधारावर मण्यांची संख्या 108 निर्धारित करण्यात आली आहे.
पुढे जाणून घ्या, या संदर्भातील आणखी काही खास गोष्टी....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)