आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परंपरा : नवरात्रीमध्ये कोणकोणती खास कामे अवश्य करावीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार, 25 सप्टेंबरपासून नवरात्रीच्या नऊ दिवसांचा उत्सव सुरु होत आहे. या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गच्या वेगवेगळ्या स्वरुपांची उपासना केली जाते. शास्त्रानुसार देव दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी करण्यात आलेली पूजा लवकर शुभफळ प्रदान करणारी मानली गेली आहे. यामुळे देवी दुर्गाच्या नऊ दिवसांच्या काळामध्ये काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करून देवीची उपासना केल्यास नजीकच्या काळात शुभफळ प्राप्त होऊ शकतात. येथे जाणून घ्या, प्राचीन प्रथेनुसार नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणती कामे करावीत...

- नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शेतातील किंवा बागेतील मातीपासून वेदी तयार करून त्यामध्ये पाच ध्यान पेरावेत.

- या वेदीवर सामर्थ्यानुसार सोने, चांदी, तांबे किंवा मातीचा कलश स्थापन करावा.

- कलशावरसुद्धा सोने, चांदी, तांबे, माती किंवा पाषाणाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. मूर्ती नसेल तर कलशाच्या मागे स्वस्तिक आणि दोन्ही बाजूने त्रिशूळ काढून देवीची प्रतिमा, पुस्तक किंवा शाळीग्राम स्थापित करून भगवान विष्णूची पूजा करावी.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)