आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, पूजन कर्मामध्ये धोतर परिधान करणे का आवश्यक आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही प्रकारची पूजा-अर्चना करताना पुरुषांनी धोतर घालणे आवश्यक आहे. ही एक प्राचीन प्रथा आहे. आजही अनेक ठिकाणी पूजा करताना धोतर घालणे हा अनिवार्य नियम आहे. सध्याच्या काळात धोतर घालण्याचे चलन कमी झाले असून पूजन कर्मामध्ये धोतर परिधान करण्याची अनिवार्यता ब्राह्मणांपर्यंत सीमित राहिली आहे. प्राचीन काळात धोतर परिधान केल्यशिवाय पूजन कर्मकांड पूर्ण मानले जात नव्हते. याच कारणामुळे धोतर पवित्र परिधान मानण्यात आले आहे.
धोतर परिधान करण्याचे वैज्ञानिक महत्त्व
धोतर परिधान करण्यामागे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे. पूजा करताना बराच वेळ साधकाला एका विशेष स्थितीमध्ये बसावे लागते, त्या स्थितीमध्ये धोतरापेक्षा इतर कोणतेही वस्त्र योग्य ठरू शकत नाही. आजकाल लोक जीन्स, पँट अशा प्रकरचे कपडे घालून पूजा करतात, ज्यामुळे उठायला-बसायला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शरीरातील रोमछिद्रांमधून आपल्याला शुभ प्राणवायू मिळतो, तंग कपडे यामध्ये केवळ बाधाच निर्माण करत नाहीत तर रक्तप्रवाहावरसुद्धा वाईट प्रभाव टाकतात. यामुळे आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही धोतर परिधान करणे लाभदायक आहे. धोतर बारीक सुती कापडापासून तयार केले जाते, जे सुविधाजनक असते. याच कारणामुळे पूजन कर्मामध्ये धोतर परिधान करावे.