आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, श्रीगणेश मूर्ती मातीपासूनच घडवलेली का असावी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगणेशाची स्थापना करण्यासाठीची मूर्ती मातीपासूनच तयार केलेली असावी, यामागे पर्यावरण संवर्धनाबरोबरच शास्त्रीय कारणही आहे. श्रीगणेशाच्या जन्मकथेमध्येच याचे रहस्य दडलेले आहे. धर्म ग्रंथातील माहितीनुसार पार्वतीमातेने मातीपासून (मळापासून) ही मूर्ती तयार केली होती. (काही धर्म ग्रंथामध्ये ही मूर्ती उटण्यापासून तयार करण्यात आल्याचेही वर्णन करण्यात आले आहे.) त्यानंतर या मूर्तीला प्राण अर्पण करून पार्वतीमाता स्नानाला गेल्या होत्या.
आईच्या आज्ञेनुसार हा बालक पहारा देत होता. त्यावेळी महादेव त्याठिकाणी आले. पहारा देणा-या या बालकाने त्यांना आत जाण्यापासून अडवल्याने क्रोधात महादेवांनी त्या बालकाचा शीरच्छेद केला. त्यानंतर पार्वतीमातेचा राग शांत करण्यासाठी महादेवांनी हत्तीचे मस्तक जोडून त्या बालकाला पुन्हा जीवदान दिले. त्यामुळे श्रीगणेश पुनर्जीवित होऊन एका दिव्य स्वरुपात भक्तांसमोर आले.

ही कथा त्यांच्या जन्मामध्ये पार्थिव तत्व म्हणजे मातीचे महत्त्व सांगते. यामुळे मातीची श्रीगणेशाची मूर्ती स्थापना करणेच श्रेष्ठ मानले जाते.