आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : छोट्या-छोट्या गोष्टी. घरामध्ये याकडे लक्ष न दिल्यास रुष्ट होते महालक्ष्मी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धन, ऐश्वर्य आणि वैभवशाली जीवनासाठी लोक महालक्ष्मीची पूजा आणि उपासना करतात. दरिद्रता दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रमुख सूत्र आपल्या धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहेत. या सूत्रांचे पालन न केल्यास लक्ष्मीची कितीही उपासना केली तरी घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास राहत नाही. येथे जाणून घ्या, स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...

कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्।
सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्।।


या दोन वेळेला झोपू नये - सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळा हिंदू धर्मामध्ये शुभ, मंगलकारी आणि दैवीय कृपा प्राप्त करून देणाऱ्या मानल्या गेल्या आहेत. सुर्योदयामध्ये लक्ष्मीपती विष्णूचा वास मानण्यात आला असून संध्याकाळची वेळ देवी लक्ष्मीची भ्रमण वेळ मानण्यात आली आहे. यामुळे या दोन्ही वेळेला झोपल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही आणि घरातिक सुख-समृद्धी कमी होऊ लागते.
मळलेले कपडे परिधान करणे - शास्त्रानुसार जे लोक मळलेले, फाटके कपडे परिधान करतात, ज्यांना जुने कपडे घालून फिरण्यात आनंद मिळतो तेथे दारिद्र्तेचा वास असतो. जर घरामध्ये किचनपासून ते कार स्वच्छ करण्यापर्यंतचा कपडा स्वच्छ नसेल तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आणखी काही खास गोष्टी...