रुद्राक्ष म्हणजे मनुष्याला मिळालेली एक अदभूत देणगीच आहे. रुद्राक्षाचा उपयोग भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे पौराणिक मान्यतेनुसार रुद्राक्ष महादेवाचा अंश आहे. यामुळे रुद्राक्षाला साक्षात महादेवाचे स्वरूप मानले जाते. याच्या शुभ प्रभावाने सुख-समृद्धी, सौभाग्यात वृद्धी होते. रुद्राक्षाच्या आकार आणि स्वरूपानुसार वेगवेगळे फळ आणि प्रभाव प्राप्त होतात. धार्मिक दृष्टीकोनातून रुद्राक्ष पापनाशक मानले जातात. परंतु रुद्राक्षाचे शुभफळ आणि प्रभाव प्राप्त करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास याचे अशुभ प्रभाव दिसून येतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे..