आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara Know The Tradition About Worship To God

पूजेच्या आधी का करावा संकल्प?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा करण्याच्या अनेक पद्धती शास्त्रात सांगितलेल्या आहेत. विधीवत पूजा केल्याने लवकरच पूजेचे फळ मिळते. त्यामुळेच घरात कसलीही पूजा असली तरी ब्राम्हणाला बोलवून त्याच्या हस्ते पूजा करून घेतली जाते. याचप्रकारे तुम्ही स्वतःही रोज पूजा करताना काही नियम पाळले तर देव प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात.
शास्त्रानूसार कुठलीही पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे असते. पूजेच्या आधी संकल्प केला नाही तर पूजा सफल होत नाही. संकल्पाविना पूजा केल्यास इंद्रदेवाला त्याचे फळ मिळते असे सांगितले जाते. त्यामुळे कुठलीही पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे आहे.
संकल्प घेणे म्हणजे काय?
संकल्प घेणे म्हणजे आपण इंद्रदेवाला आणि स्वताला साक्षी ठेऊन अशी प्रतिज्ञा करतो, की मी हे कार्य इच्छापूर्तीसाठी करत असून ते मी अवश्य पूर्ण करेल. संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते. कारण पंचमाहाभूतांपैकी (आग्नि, पृथ्वी, आकाश, हवा आणि पाणी) गणपती हा पाण्याचा आधीपती आहे. शेवटी पाणी गणपती समोर ठेऊन पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो .
एकदा संकल्प केल्यानंतर ती पूजा करणे गरजेचे असते. यामुळे आपली संकल्प शक्ती वाढते आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धाडस प्राप्त होते.