आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara Know The Tradition About Worship To Lord Shiva 18 April 14

जाणून घ्‍या, शिवलिंगावर का वाहिली जात नाही हळद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा करण्‍यासाठी हिंदू धर्मांमध्‍ये अनेक नियम सांगण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक देवाची पूजा करण्‍याची आणि प्रार्थना करण्‍याची पद्धत वेगवेगळी पहायला मिळते. विविध सामग्रीच्‍या सहाय्याने केलेली पूजा लाभदायक ठरते. या सामग्रीमध्‍ये हळदीला विशेष महत्त्व आहे. काही पूजेच्‍या विधी अशा आहेत, त्‍या विधीसाठी हळद वापरली नाही तर पूजा सफल होत नाही. याशिवाय आहारामध्‍ये हळद महत्त्वाची भुमीका पार पाडते. हळदीमध्‍ये विविध लाभदायक गुण असल्‍यामुळे हळद आजारावर रामबाण उपाय म्‍हणून वापरतात. हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्‍ये मोठ्या प्रमाणात केला जातो.
मात्र ही गुणकारी हळद शिवलिंगावर वाहिली जात नाही. आज आम्‍ही आपल्‍याला सांगणार आहोत हळद का शिवलिंगावर वाहिली जात नाही.
शिवलिंगाची पूजा केल्‍यानंतर सर्व इच्‍छा, मनोकामणा पूर्ण होतात. शास्‍त्रामध्‍ये सांगितलेल्‍या विधिनुसार जर शिवलींगाची पूजा केली तर, शवशंकर लवकर प्रसन्न होतात. शिवपूजेचे अनेक नियम सांगण्‍यात आले आहेत. त्‍यामध्‍ये विविध प्रकारच्‍या वस्‍तु शिवपूजेसाठी वापरल्‍या जातात. हळद मात्र वापरली जात नाही.
का वाहिली जात नाहीत हळद-
पूजेमध्‍ये गंध आणि औषधी म्‍हणून हळदीचा वापर केला जातो. शिवशकंर सोडले तर सर्व देवाला हळद- कुंकु वाहिले जाते. शिवलिंग पुरूष तत्वाचे प्रतिक असल्‍यामुळे व हळद ही स्‍त्री तत्वाचे प्रतिक असल्‍यामुळे हळद शिवलिंगावर वाहिली जात नाही.
जलधारासाठी (पार्वती) हळद वाहिली जाते-
शिवलिंगावर हळद वाहिली जात नसली तरी जलाधारीची पूजा करताना हळद वापरता येते. शास्‍त्रानुसार शिवलिंग दोन भागापासून तयार झाले आहे. शिवलिंगाचा अर्धा भाग हा शिवशंकराचे प्रतिक म्‍हणून ओळखला जातो, तर अर्धा भाग जलाधारी पार्वती मातेचे प्रतिक आहे. शिवलिंग पुरूष तत्‍वाचे प्रतिक असल्‍यामुळे हळद वाहिली जात नाही.