आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह करताना वर-वधु का घेतात सप्तपदी? जाणून घ्या, धार्मिक परंपरांमागील रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू संस्कृतीत बारसे, विवाह आणि अंत्यसंस्कार या सारख्या अनेक धार्मिक परंपरा आहेत. व्यक्ति श्रीमंत असो वा गरीब त्याला या परंपरांचे पालन कराव लागते. मात्र, या परंपरांचे पालन का केले जाते. त्यांच्या मागील रहस्य काय? हे मोजक्याच लोकांना ठावूक असते. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला भारतीय संस्कृतीमधील काही विविष्ट परपंराविषयी माहिती देत आहोत
विवाह करताना वर-वधू का घेतात सप्तपदी?
धार्मिक शास्त्रांत धर्म, अर्थ, काम व मोक्ष ही चार रुपे शास्त्रात सांगितली आहेत. मात्र, कुठेही सप्तपदीचा उल्लेख आढळत नाही. विवाह करताना सप्तपदीची परंपरा प्रचलित झाली आहे. गृहस्थाश्रमात प्रवेश करण्‍यापूर्वी वर-वधु एकमेकांना सात वचने देतात. वैदिक आणि पौराणिक शास्त्रात सप्तपदी तसेच सात अंकाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

ब्रम्हांडात प्रमुख सात ग्रह, सात समुद्र, सप्त ऋषि, सात रंग आहेत. त्यामुळे सप्तपदी ही वर-वधुच्या जीवनाला पूर्णरुप देते. यात जप, तप, व्रत, नियम, दान, कर्म व आरोग्य हे सात संस्कार विवाह संपन्न करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. नवदाम्पत्य सातजन्म एकमेकांची साथ देईल, एकमेकांचा विश्वासघात करणार नाही, हा सप्तपदीमागील उद्देश आहे.

पुढील स्लाइड वर क्लिक करून वाचा, शुभकार्यात पांढरे वस्त्र स्त्रियांसाठी का वर्जित मानले जातात?