ज्योतिर्विज्ञानानुसार आठवड्यात सात दिवस मानण्यात आले आहेत. सातही दिवसांना कोणत्या न कोणत्या विशेष ग्रहाचे मानण्यात आले आहेत. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाशी संबंधित एखादी विशेष प्रथा किंवा मान्यता निगडीत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये काही कामांसाठी एखादा विशेष दिवस वर्ज्य सांगण्यात आला आहे तर एखादा दिवस शुभ मनाला जातो. येथे जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणते काम करणे शुभ नसते आणि कोणत्या दिवशी कोणते काम अवश्य करावे....
कोणत्या दिवशी तेल लावावे आणि कोणत्या दिवशी लावू नये...
- सोमवारी तेल लावल्याने चेहऱ्यावर कांती येते.
- मंगळवारी तेल लावल्यास आजार घरामध्ये पसरण्याची शक्यता निर्माण होते
- बुधवारी तेल लावल्यास सुख, सौभाग्य आणि सौंदर्यात वृद्धी होते.
- गुरुवारी चुकूनही तेल लावू नये, या दिवशी तेल लावल्यास घरात गरिबी येते.
- शुक्रवारी तेल लावल्यास एखाद्या मोठ्या कामात नुकसान होऊ शकते
- शनिवारी तेल लावणे शुभ मानले जाते. या दिवशी तेल लावल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते.
पुढे जाणून घ्या, इतर काही खास प्राचीन प्रथा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)