आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी का केली जाते पिंपळाच्या झाडाची पूजा?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे. पिंपळाचे झाड प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. असे मानले जाते की, पिंपळाच्या झाडाचे दर्शन-पूजन केल्याने दीर्घायुष आणि समृद्धी प्राप्त होते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, शनिवारी पिंपळाच्या झाडाचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व का आहे?

धार्मिक मान्यतेनुसार, शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. या दिवशी पिंपळाचे पूजन आणि या झाडाला सात प्रदक्षिणा घातल्याने शनि पिडा दूर होते. आयुर्वेदामध्ये पिंपळाचे झाड औषधी गुणांनी भरलेले असल्याचे सांगितले आहे.

शनि अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. श्रावण महिन्यात अमावस्या झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. पिंपळाचे झाड ब्रह्मस्थान असून यामुळे सात्विकता वाढते. यामुळे पिंपळाच्या झाडाची शनिवारी पूजा करावी.