आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण महिन्यात स्त्रियांनी अवश्य घालाव्यात हिरव्या बांगड्या, कारण की...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाच्या बांगड्यांना हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. तसेच, बांगड्यांना आपल्या ग्रंथांमध्ये सोळा श्रुंगारातील एक श्रुंगार मानण्यात आले आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या बांगड्या घालण्याचे विशेष महत्त्व आहे. विशेषतः श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा आहे, परंतु या प्रथेची माहिती फार कमी लोकांना असावी. आज आम्ही तुम्हाला यामागचे कारण सांगत आहोत.

श्रावण महिन्यात का घालाव्यात हिरव्या बांगड्या...
श्रावण महिन्याला निसर्गाचा, हिरवळीचा महिना मानले जाते. शास्त्रानुसार स्त्रियांना शक्ती म्हणजे निसर्गाचे रूप मानण्यात आले आहे. हिरव्या रंगला नवनिर्मिती शक्तीचे प्रतिक मानले जाते. श्रावण महिन्यात निसर्गामध्ये झालेल्या हार्मोन्समध्येसुद्धा बदल होतो, ज्याचा प्रभाव शरीर आणि मनावर पडतो जो स्त्री, पुरुषाच्या काम भावनेला वाढवतो.

ज्योतिष शास्त्रानुसार हिरवा रंग बुध ग्रहाने प्रभावित आहे. बुध एक नपुंसक ग्रह आहे. यामुळे बुधाने प्रभावित असलेला हिरवा रंग काम भावनेला नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. श्रावण महिन्यात मेहंदी लावण्यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा हेच मानले जाते.