आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणत्या दिशेला डोके ठेवून का झोपू नये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या दिनचर्येतील सर्वात महत्त्वपूर्ण अंग शयन आहे. शयन म्हणजे झोप. मनुष्य, पशु-पक्षी, झाडे-झुडपं सर्वजण शयन करतात. झोप कशाप्रकारे आल्या स्वास्थ्य आणि चेतनेसाठी लाभदायक ठरू शकते, यासाठी शास्त्रामध्ये विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. झोपताना पाय दक्षिणेकडे असू नयेत आणि उत्तर दिशेकडे डोके ठेवून झोपू नये. अशा स्थितीमध्ये झोपल्यास मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये झोपण्याशी संबंधित सांगण्यात आलेल्या काही खास गोष्टी...

दिवसभर काम करून आपण थकून जातो. आपल्या शरीरातील उर्जा कमी होते. अशावेळी शरीराला आरामाची आवश्यकता असते. शरीराला आराम देण्यासाठी आपण झोपतो. जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा स्वतःमध्ये ताजेपणा, स्फूर्तीचा अनुभव करतो. झोपल्यानंतर आपल्यामध्ये पुन्हा उर्जा एकत्र होते, ज्यामुळे आपल्याला काम करण्याची ताकद मिळते. झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे. याच कारणामुळे आपल्या ऋषीमुनींनी या संदर्भात काही नियम तयार करून ठेवले आहेत. या नियमांचे पालन केल्यास झोपेचा अधिकाधिक लाभ प्राप्त होऊ शकतो. संध्याकाळी झोपू नये, झोपताना पाय दक्षिणेकडे करू नयेत असे निर्देश शास्त्रामध्ये देण्यात आले आहेत.

पुढे जाणून घ्या, झोपेशी संबंधित इतर काही खास गोष्टी...