आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Should Remember These Things About Bilwa Patra In Worship

दरिद्रता दूर करण्याचे उपाय, बिल्वपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये महेश अर्थात महादेवाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे. महादेवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या पूजन समग्री अर्पण केल्या जातात. यामधील सर्वाधिक महत्त्पूर्ण आहे बिल्वपत्र (बेलाचे पानं). असे मानले जाते की, शिवलिंगावर केवळ बेलाचे पानं अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. याच कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानले जाते.

बेलाच्या झाडाचा परिचय
बेलाच्या झाडाचा आकार मध्यम असून याला काटे असतात. या झाडाची पाने मुख्यतः तीन-तीनच्या संख्येमध्ये एकत्र असतात. या तीन पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक मानले जाते. या झाडाची फुले पांढऱ्या रंगाची असतात आणि फळ गोलाकार असते. आयुर्वेदामध्ये या फळाचा उपयोग विविध प्रकारचे औषध बनवण्यासाठी केला जातो.
वारंवार धुवून बेलाचे पान पुन्हा अर्पण केले जाऊ शकते...
बिल्वपत्राच्या संदर्भातील एक खास गोष्ट म्हणजे शिवलिंगावर अर्पण केलेले बेलाचे पानं अनेक दिवसांपर्यंत वारंवार धुवून पुन्हा महादेवाला अर्पण केले जाऊ शकतात. शिवपुराणानुसार शिवलिंगावर दररोज विशेषतः सोमवारी आणि श्रावण महिन्यात बेलाचे पानं अर्पण केल्यास सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. बेलाच्या पानांना अधिक महत्त्व असल्यामुळे शास्त्रामध्ये या संदर्भात विविध प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. काही दिवस आणि तिथी अशा आहेत, जेव्हा या झाडाची पानं तोडू नयेत.

पुढे जाणून घ्या, कोणत्या दिवशी आणि तिथीला बेलाची पानं तोडू नयेत...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)