आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Benefits Of Gomutra According To Hindu Mythology

घरामध्ये गोमुत्र शिंपडल्याने होतील हे खास लाभ, दूर होतील आजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहावी यासाठी प्राचीन काळापासून विविध प्रथा प्रचलित आहेत. या प्रथांचे पालन ज्या घरांमध्ये केले जाते, तेथील वातावरण सकारात्मक आणि पवित्र राहते. प्राचीन काळी दररोज घरामध्ये गोमुत्र शिंपडले जात होते. असे केल्याने घरातील वातारण शुभ आणि पवित्र राहत होते. आजही अनेक लोक या प्रथेचे पालन करतात. येथे जाणून घ्या, गोमुत्र शिंपडल्याने कोणकोणते लाभ प्राप्त होतात...
गायीची सेवा केल्याने प्रसन्न होतात देवी-देवता
हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र आणि पूजनीय मानण्यात आले आहे. गायीच्या शरीरात सर्व देवी-देवतांचा निवास असतो असे मानले जाते. याच कारणामुळे गायीचा कधीही अनादर करू नये. जे लोक गायीची सेवा करतात त्यांना सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊन पुण्यात वाढ होते. प्राचीन काळी प्रत्येक घरामध्ये गायीचे संगोपन केले जायचे, परंतु सध्याच्या काळात फार कमी लोकांच्या घरी गाय दृष्टीस पडते. ज्या लोकांचा घरात गाय नसेल त्यांनी नियमितपणे गोशाळेत जाऊन हिरवा चारा दान करावा तसेच इच्छेनुसार धन दान करावे. गायीचे महत्त्व एका गोष्टीवरून समजते ते म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णाने गोमातेची सेवा केली आहे.

पुढे जाणून घ्या, गोमुत्र शिंपडल्याने कोणकोणते लाभ होतात...