आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Should Take Bath Early Morning Know The Reasons

सकाळी लवकर स्नान केल्याने वाढते चेहर्‍याची चमक आणि होतात हे फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तम स्वास्थ्य आणि सुंदर शरीरासाठी दररोज स्नान करणे आवश्यक आहे. स्नान करण्याची सर्वात योग्य वेळ सकाळची आहे. शास्त्रामध्ये सकाळी लवकर स्नान करण्याचे चमत्कारिक फायदे सांगण्यात आले आहेत. स्नान करताना येथे सांगण्यात आलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते तसेच कुंडलीतील इतर दोषही नष्ट होतात. सकाळी लवकर स्नान केल्यास आरोग्यदायी लाभही होतात.

सकाळी लवकर स्नान करण्याचे फायदे...
शास्त्रामध्ये सकाळी झोपेतून लवकर उठणे अनिवार्य सांगण्यात आले आहे. सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने त्वचेची चमक वाढते आणि दिवसभर आळसाचा सामना करावा लागत नाही. जे लोक उशिरा स्नान करतात ते जास्त प्रमाणात आळशी असतात. हे लोक लवकर थकतात आणि कमी वयातच त्वचेची चमकही कमी होते.

सकाळी लवकर स्नान केल्यानंतर दररोज सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याला जल अर्पण केल्याने मान-सन्मानात वृद्धी होते तसेच केलेल्या कामाचे कौतुक होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या स्नानाशी संबंधित खास गोष्टी...