आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Is Considered Good To Eat Sitting On The Ground?

जाणून घ्‍या, जमिनीवर बसून भोजन करणे आरोग्‍यासाठी लाभदायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्‍या काळानुसार मानवाच्‍या जगण्‍याच्‍या पद्धतीही बदलत गेल्‍या. अगदी काम करण्‍याच्‍या पद्धतीपासून ते जगण्‍याच्‍या पद्धती पर्यंत सर्व क्षेत्रामध्‍ये बदल झालेले आपल्‍याला पहायला मिळतात. बदलत्‍या काळाचा परिणाम आपल्‍या खाण्‍याच्‍या पद्धतीवरही झाला. काही वर्षापुर्वी पाटावर बसून किंवा जमिनीवर बसून जेवन केले जात होते. आज मात्र घरा-घरामध्‍ये डायनिंग टेबल आल्‍यामुळे जमीनवर बसून जेवन करण्‍याची पद्धत बंद पडत चाचली आहे. जमिनीवर बसून जेवन करण्‍याच्‍या पद्धतीमागे अनेक शास्‍त्रीय कारणे होती.
डायनिंग टेबरलवर बसून जेवन केल्‍यांनतर आरोग्‍याचे प्रश्‍न निर्माण होतात, असे अरोग्‍य तज्‍ज्ञांचे मत आहे. याच्‍या उलट जे लोक जमिनीवर बसून पारंपरिक पद्धतीने जेवन करतात त्‍यांना छोट्या- छोट्या आजाराचा त्रास होत नाही.
जमिनीवर बसून भोजन करण्‍याचे काय आहेत फायदे
जमिनीवर बसून जेवन करत असताना आपण विशेष योगासनाच्‍या अवस्‍थेत बसत असतो. या आसनाला सुखासन नावाने ओळखले जाते. सुखासन हे पद्मासनाचा एक प्रकार आहे.
जमिनीवर बसून जेवन केल्‍यानंतर चांगल्‍याप्रकारे जेवन होते.
जमिनीवर बसून जेवन केल्‍यांनतर एकागृता वाढते.
सुखासनामुळे पुर्ण शरीरातील रक्‍त पुरवठा सुरळीत होतो. यामुळे शरीराला लागणारी उर्जा प्राप्‍त होते.
या आसनामुळे मानसिक तनाव कमी होतो. मनामध्‍ये सकारात्‍मक विचार येतात.
जमिनीवर बसून जेवन केल्‍यानंतर छाती आणि पाय मजबूत होतात.
जमिनीवर बसून जेवन केल्‍यानंतर पोट सुटत नाही. शिवाय अपचन, जळजळ, पोटासंबधीत विकार होत नाहीत.