आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why This Day Is The Worship Of Goddess Saraswati

जाणून घ्या, वसंत पंचमीलाच का केले जाते देवी सरस्वतीचे पूजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर माता सरस्वतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. ४ फेब्रुवारीला मंगळवारी वसंत पंचमी आहे. वसंत पंचमीलाच सरस्वतीचे पूजन केले जाते. यामागे एक अख्यायिका आहे.

ब्रह्मदेवाने भगवान विष्णू यांच्या आज्ञेनुसार सृष्टीची रचना केली. मानवाची उत्पत्ती केली. त्यानंतर निर्माण झालेल्या सृष्टीवर ब्रह्मदेवाने एक दृष्टी टाकली असता काही तरी कमतरता असल्याचे त्यांना जाणवले. ते म्हणजे चहू बाजूला स्मशान शांतता पसरलेली आहे, कोणत्याही गोष्टीत उत्साह नव्हता. त्यामुळे चिंतातुर झालेल्या ब्रह्मदेवाने पुन्हा भगवान विष्‍णू यांच्या अनुमतीने एक चर्तुभुज स्त्रीची रचना केली. तिच्या एका हातात वीणा आणि दुसर्‍या हातात मुद्रा तर अन्य दोन हातात पुस्तक आणि माळा होती. ब्रह्माने तयार केलेल्या देवीला वीणा वाजविण्याची विनंती केल्यानंतर देवीने वीणेचा मधुरनाद केला. त्यामुळे सार्‍या सृष्टीस वाणी प्राप्त झाली. जलधारा-प्रवाहामध्य चेतना निर्माण झाली. ढग गडगडू लागले. सृष्‍टीत चैतन्य संचारल्याने आनंदविभोर झालेल्या ब्रह्मदेवाने या देवीचे नामकरण सरस्वती असे केले. आणि तो दिवस वसंत पंचमीचा!