आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला साफ-सफाई करण्यामागचे खास कारण, घरातील वस्तू चमकवण्याचे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वजण आतुरतेने वाट पाहात असलेला दिवाळीचा सण काही दिवसांनंतर म्हणजे 21 ऑक्टोबर, मंगळवापासून पाच दिवस घराघरात उत्साहाने साजरा केला जाईल. या विशेष दिवसांसाठी काही दिवस अगोदरच तयारी सुरु केली जाते. प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आली असून, दिवाळीला घराची साफ-सफाई, रंग-रंगोटी केली जाते. घरातील सर्व छोट्या-मोठ्या वस्तूंना स्वच्छ केले जाते.

दिवाळीला साफ-सफाईशी संबंधित धार्मिक मान्यता
धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या काळामध्ये महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता आणि पवित्रता असे त्या घरात निवास करते. लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठीच दिवाळीपूर्वी घरांची साफ-सफाई केली जाते.
दिवाळीला घराची स्वच्छता करण्यामागे हे ही एक आहे खास कारण
दिवाळीला घराची साफ-सफाई, रंग-रंगोटी करण्यामागे एक कारण हे ही आहे की, या सणाच्या निमित्ताने वर्षातून एकदा घरातील कोपरा न कोपरा पूर्णपणे स्वच्छ केला जातो. घराला रंग दिला जातो, ज्यामुळे घरातील धूळ, कचरा दूर होतो. कार्तिक-आश्विन मासापुर्वी पावसाळ्याचा काल असतो. पावसामुळे घरातील भिंती घाण होतात आणि काळ्या पडतात, भीतींमध्ये ओलावा, थंडावा निर्माण होतो यामध्ये विविध प्रकारचे हानिकारक किटाणू जमा होतात. या गोष्टींमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या सर्व गोष्टींपासून दूरू राहण्यासाठी पावसाळ्यानंतर घराची आतून आणि बाहेरून साफ-सफाई, रंगरंगोटी करण्याची प्रथा चालत आली आहे.
घरातील वस्तू चमकवण्यासाठी काही खास घरगुती उपाय
पांढऱ्या व्हिनेगरमध्ये टिशू पेपर किंवा सुती कपड्याचा तुकडा भिजवून नळाच्या तोटीला चारही बाजूने गुंडाळून ठेवा. 20 - 25 मिनिटांनी कपडा काढून टाका. तोटी स्वच्छ होईल.
पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)