( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
सकळी झोपेतून उठल्यानंतर तळहातांचे दर्शन केल्याने लक्ष्मी, सरस्वती आणि श्रीहरींची कृपा प्राप्त होते. लक्ष्मी कृपेने धन, सरस्वतीच्या कृपेने ज्ञान आणि विष्णुच्या कृपेने सर्व सुखांची प्राप्ति होण्यास मदत होते. त्यामुले सकाळी उठल्या-उठल्या प्रथम
आपल्या तळहातांचे दर्शन करण्याचा संकल्प करा.
सकाळी उठल्यानंतर हाथ एकत्र जोडून एखाद्या पुस्तक उघडल्याप्रमाणे उघडावे आणि खाली देण्यात आलेला श्लोक वाचत हातांचे दर्शन करावे -
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।
कर मूले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम्॥
अर्थ- हाताच्या अग्रभागी लक्ष्मीच, मध्यभागी सरस्वतीचा आणि मूल भागामध्ये ब्रह्माचा निवास आहे आणि मी यांना नमस्कार करतो/करते.
हातांचे दर्शन करताना आणखी एका मंत्रांचा उच्चार केला जातो..
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।
करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥
हा आहे हातांच्या दर्शन घेण्याचा मूल भाव
हातांच्या दर्शनाचा मूळ भाव हाच आहे की, आपला आपल्या कर्मावर विश्वास पाहिजे. त्यामुळे आपण देवाला प्रार्थना करतो की, आमच्या हातून असे कर्म घडू देत ज्यामुळे जीवनात धन, सुख आणि ज्ञान प्राप्त होईल. तसेच आमच्या हातून असे कर्म घडू देत ज्यामुळे दुस-यांना देखील लाभ होईल. आमच्या हातून कधीच चुकचे कार्य घडू देऊ नकोस.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, या परंपरेशी निगडित शास्त्रात सांगण्यात आलेल्या काही गोष्टी ...