आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, सकाळी कोणत्या वेळी अंथरून सोडल्याने मिळते लक्ष्मी आणि दीर्घायुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीने दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठावे. ब्रह्म म्हणजे परम तत्व किंवा परमात्मा. मुहूर्त म्हणजे अनुकूल काळ. रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजे पहाटे 4 ते 5.30 या काळाला ब्रह्म मुहूर्त म्हटले जाते. आपली दिनचर्या सकाळी झोपेतून उठल्यापासून सुरु होते. यामुळे सकाळी लवकर उठेने हा दिनचर्येचा सर्वात पहिला महत्त्वपूर्ण भाग आहे. याच कारणामुळे आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी लवकर उठण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे, ती ब्रह्म मुहूर्ताची वेळ आहे.

ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणे आपल्या जीवनासाठी खूप लाभकारी आहे. यामुळे आपले शरीर स्वस्थ आणि दिवसभर उर्जा कायम राहते. निरोगी राहण्याचा आणि यशस्वी होण्याचा हा असा फॉर्मुला आहे, ज्यामध्ये काहीच खर्च होत नाही. केवळ आळस झटकून टाकण्याची आवश्यकता आहे.

शास्त्रामध्ये सांगण्यात आला आहे, की
वर्णं कीर्तिं मतिं लक्ष्मीं स्वास्थ्यमायुश्च विदन्ति।
ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छि वा पंकज यथा॥
- भाव प्रकाश सार-93

अर्थ- ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठल्यास व्यक्तीला सुंदरता, बुद्धी, स्वास्थ्य, आयु इ, गोष्टींची प्राप्ती होते. असे केल्याने शरीर कमळाच्या फुलाप्रमाणे सुंदर होते.

पुढे जाणून घ्या, सकाळी लवकर झोपेतून उठल्याने कोणकोणते लाभ होतात...
(येथे फोटोंचा वापर फक्त सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)