आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये पूजा करताना कोणकोणत्या गोष्टी ठेवाव्यात लक्षात आणि का ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवी-देवतांची पूजा केल्याने दुःख, अडचणी दूर होतात, तेसेच मानसिक शांतता मिळते. याच कारणामुळे प्राचीन काळापासून पूजा करण्याची प्रथा चालत आली आहे. ज्या घरामध्ये दररोज पूजा केली जाते, तेथील वातावरण सकारात्मक (Positive) आणि पवित्र राहते. दिवा आणि उदबत्तीच्या धुराने आरोग्याला हानिकारक असणारे सुक्ष किटाणू नष्ट होतात. शास्त्रामध्ये पूजा करताना काही आवश्यक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करत पूजा केल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, पूजा करताना कोणत्या 20 नियमांकडे विशेष लक्ष द्यावे....

1. सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तांदूळ (अक्षता) अवश्य अर्पण केले जातात. पूजा करताना अखंड (न तुटला) तांदळाचा उपयोग करावा. अक्षता अर्पण करण्यापूर्वी त्या हळदीने पिवळ्या करून घ्याव्यात. यासाठी थोड्याश्या पाण्यामध्ये हळद टाकून त्यामध्ये तांदूळ बुडवून पिअवले केले जाऊ शकतात.
2. पूजेमध्ये विड्याचे पानही ठेवावे. लक्षात ठेवा, विद्याच्या पानावर विलायची, गुलकंद, लवंग या गोष्टी ठेवाव्यात. संपूर्ण तयार केलेले पान अर्पण केल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होऊ शकते.
3. देवी-देवतांसमोर तूप आणि तेल, हे दोन्ही दिवे लावावेत. तेलाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवस उजव्या बाजूला लावावा.
4. कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये त्यांचे आवाहन (आमंत्रित करणे) करणे, ध्यान करणे, आसन देणे, अभिषेक करणे, धूप-दीप लावणे, अक्षता, फुल, नैवेद्य अर्पण करणे अनिवार्य आहे.
5. देवी-देवतांना हार-फुल, पानं इ. गोष्टी अर्पण करण्यापूर्वी एकदा स्वच्छ पाण्याने अवश्य धुवून घ्या.

पुढे जाणून घ्या, पूजा करताना इतर कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे...
बातम्या आणखी आहेत...