Home »Jeevan Mantra »Dharm» 10 Interesting Facts Of Hindu Dharma News In Marathi

लंकेत जाण्यासाठी किती दिवसात तयार झाला रामसेतू? वाचा 10 पौराणिक Fact

जीवनमंत्र डेस्क | Oct 06, 2017, 14:56 PM IST

हिंदू धर्म साहित्य खूपच विस्तृत आहे. या अंतर्गत अनेक पुराण, वेद, धर्म ग्रंथ, उपनिषद इ. येतात. या सर्व ग्रंथांमध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीला माहित नसतील. काही लोकांनी या संदर्भातील काही गोष्टी ऐकल्या असतील, परंतु विस्तृत स्वरुपात या गोष्टी फारच कमी लोकांना माहिती असाव्यात. हिंदू धर्म ग्रंथातील या गोष्टी प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला हिंदू धर्म ग्रंथाशी संबंधित काही रोचक प्रश्नांची उत्तरे सांगत आहोत...

किती दिवसात तयार झाला रामसेतू, किती लांब-रुंद होता हा पूल?
वाल्मिकी रामायणानुसार समुद्रावर सेतू बांधण्यासाठी वानरांना पाच दिवस लागले होते. पहिल्या दिवशी वानरांनी 14 योजन, दुसर्या दिवशी 20 योजन, तिसर्या दिवशी 21 योजन, चौथ्या दिवशी 22 योजन आणि पाचव्या दिवशी 23 योजन सेतू बांधला होता. अशाप्रकारे एकूण 100 योजन लांबीचा हा सेतू होता. हा पूल 10 योजन रुंद होता. (वैदिक काळातील लांबी मोजण्याचे एकक. एक योजन 4 कोस म्हणजे 13-16 कि.मी.)

पुढे जाणून घ्या, अशाच इतर काही रोचक प्रश्नांची उत्तरे...

Next Article

Recommended