आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकष्ट चतुर्थी : या गणेश मंत्रांच्या स्मरणाने दूर होतील सर्व अडचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मनुष्य कोणत्या न कोणत्या छोट्या किंवा मोठ्या अडचणीत अडकलेला असतो, अनेकवेळा सुखाच्या काळातही अडचण आपली पाठ सोडत नाही. शास्त्रानुसार मनुष्याच्या कर्म आणि व्यवहारानुसार या अडचणींना सामोरे जावे लागते. हिंदू धर्मामध्ये श्रीगणेशाला बुद्धीदाता मानले गेले आहे. गणपतीची उपासना अशा मानसिक चिंता आणि संकटातून मुक्त करणारी मानली गेली आहे. याच कारणामुळे श्रीगणेश विघ्नहर्ता, मंगलमुर्ती, संकटमोचक या नावांनी पूजनीय आहेत.

तुम्हीही कौटुंबिक,व्यावसायिक,आर्थिक किंवा शारीरिक अडचणींमुळे त्रस्त असाल तर येथे सांगण्यात आलेल्या गणेश मंत्रांचा संकष्ट चतुर्थीच्या (२० मार्च) दिवशी जप केल्यास सर्व अडचणींमधून मुक्ती मिळेल. गणेश उपासनेच्या या विशेष दिवशी खालील ११ छोट्या-छोट्या मंत्राचा जप आणि गणेशाची पंचोपचार पूजा अवश्य करा.

- चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हा. त्यानंतर लाल फुल, गुलाल, वस्त्र, दुर्वा, गंध, अक्षता अर्पण करून गणपतीची पूजा करा. त्यानंतर खालील मंत्रांचे स्मरण करा...

ॐ सर्वसिद्धिप्रदाय नम:
ॐ हरये नम:
ॐ शान्ताय नम:
ॐ भक्तवांछितदायकाय नम:
ॐ ज्ञानिने नम:
ॐ गं गणपतये नमः
ॐ अकल्माषय नम:
ॐ दूर्वाबिल्वप्रियाय नम:
ॐ बुद्धिप्रियाय नम:
ॐ भक्तविघ्रविनाशाय नम:
ॐ वक्रतुण्डाय हुम्


पूजा आणि जप झाल्यानंतर गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व कुटुंबातील सदस्यांसोबत गणपतीची आरती करा. आरती आणि प्रसाद ग्रहण करून सुख-शांती, समृद्धीसाठी प्रार्थना करा.