Home | Jeevan Mantra | Dharm | 11 Work For Heaven

आयुष्यात ही कामे केलेल्या लोकांना मृत्युनंतर स्वर्गात अवश्य स्थान मिळते

धर्म डेस्क | Update - Nov 28, 2013, 12:10 PM IST

पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप-पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते.

 • 11 Work For Heaven

  पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप-पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते. पुढील जन्म तो कोणत्या रुपात घेणार हे ही त्यानुसारच निश्चित होते. गरुड पुराणानुसार विविध प्रकारचे पाप करणारे लोक नरकात जातात. स्वर्गामध्ये देवतांचा निवास आहे असे मानले जाते. चांगले कर्म करणार्‍या लोकांना स्वर्गात अवश्य स्थान मिळते.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या प्रकारचे कर्म केल्यानंतर मनुष्याला स्वर्गात स्थान मिळते...

 • 11 Work For Heaven

  होम, जप, स्नान आणि देवतांच्या पूजेमध्ये जे लोक सदैव व्यस्त राहतात त्यांना स्वर्गात स्थान मिळते. जे लोक त्यांच्या शत्रूंचा दोष कधीही सांगत नाहीत तर त्यांच्या गुणांचे वर्णन करतात अशा लोकांना स्वर्गात स्थान मिळते.

 • 11 Work For Heaven

  जे परधनामध्ये कधीही ममत्व ठेवत नाहीत आणि धर्माने प्राप्त झालेल्या धनाचा उपयोग करून जीवन व्यतीत करतात अशा लोकांना स्वर्गात स्थान मिळते.

 • 11 Work For Heaven

  जे लोक मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतात तसेच शोक,भय, क्रोध यापासून दूर राहतात त्यांना स्वर्गात स्थान मिळते.

 • 11 Work For Heaven

  सत्य, तपश्चर्‍या, क्षमा, दान आणि वेदशास्त्राच्या मार्गावर चालणार्‍या लोकांना स्वर्गात स्थान मिळते. विहीर, तलाव, आश्रम, देव मंदिर यांचे निर्माण करणार्‍या लोकांना स्वर्गात स्थान मिळते.

 • 11 Work For Heaven

  जे लोक प्राणीमात्रांवर दया दाखवतात आणि ज्यांच्यावर सर्व प्राणी विश्वास ठेवतात असे लोक स्वर्गात जातात. योग्य आचरण करणारे लोक निश्चितच स्वर्गात जातात.

 • 11 Work For Heaven

  गाय, अन्न, भूमी, वस्त्र, सोने दान करणार्‍या लोकांना स्वर्गात स्थान मिळते.

 • 11 Work For Heaven

  एकांत स्थानावर दिसलेल्या परस्त्रीला पाहून ज्या पुरुषांच्या मनामध्ये कामवासना जागृत होत नाही आणि ते पुरुष त्या स्त्रीला आपल्या आई, बहिण,मुलीच्या रुपात पाहतात त्यांना स्वर्गात स्थान मिळते.

Trending