Home | Jeevan Mantra | Dharm | 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

मकरसंक्रांतीला या 12 ज्योतिर्लिंगाच्या मंत्रांचा जप केल्यास उजळेल नशीब

धर्म डेस्क | Update - Jan 14, 2014, 06:00 PM IST

ज्योतिर्लिंग हे महादेवाचे निराकार ( ज्याला कोणतही आकार नाही असे) अनादी-अनंत( आरंभ व अनंत) स्वयंभू आणि चमत्कारिक असे रूप मानले गले आहे.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  ज्योतिर्लिंग हे महादेवाचे निराकार ( ज्याला कोणतही आकार नाही असे) अनादी-अनंत( आरंभ व अनंत) स्वयंभू आणि चमत्कारिक असे रूप मानले गले आहे. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने आणि केवळ नामस्मरण केल्याने जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो.

  शास्त्रामध्ये पाप-पीडेतून, संकटातून मुक्त करणाऱ्या महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगाचे स्मरण करण्याचे महत्व सांगितले गेले आहे. असे मानले जाते की, या ज्योतिर्लिंगामधील कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचे सकाळी स्मरण व दर्शन केले तर दिवसाची सुरुवात चांगली होते तसेच आयुष्यात सुख नांदते. दररोज दर्शन घेणे शक्य नसेल तर १२ ज्योतिर्लिंगाच्या मंत्र स्तुतीचे पाठ करावेत.

  शिवपुराणानुसार सूर्यदेव हे महादेवाचे स्वरूप आहेत. यामुळे सूर्य उपासनेच्या अचूक आणि मंगलकारी दिवशी म्हणजे मकरसंक्रांतीला ज्योतिर्लिंगाच्या विशेष मंत्राचा जप करावा. सकाळी स्नान केल्यानंतर महादेवाची चंदन, अक्षता, बेलाचे पान, फुल, अर्पण करून पंचोपचार पूजा करा. त्यानंतर पुढील मंत्राचा जप करावा.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या १२ ज्योतिर्लिंग आणि त्यांचे मंत्र....

  हे पण वाचा...
  मकरसंक्रांती : करा राशीनुसार दान, पूर्ण होतील सर्व इच्छा
  स्त्री असो किंवा पुरुष मकरसंक्रांती(14जानेवारी)ला करावीत ही 4 कामे
  14ला उगवत्या सूर्यासमोर या मंत्राचा उच्चार केल्यास पूर्ण होतील सर्व इच्छा

  जीवनात यश व उन्नतीसाठी संक्रांतीच्या दिवशी करा हा प्रभावी उपाय
  जीवनात गतीचे प्रतिक आहे उत्तरायण, पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे 'देवदान'
  जाणून घ्या, मकरसंक्रांतीला गंगा स्नानाचे का विशेष महत्व आहे
  PICS : हे आहेत मकरसंक्रांतीचे 7 प्राचीन उपाय, सूर्यदेवाच्या कृपेने उजळेल नशीब

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  सोमनाथ ज्योतिर्लिंग(सौराष्ट्र,गुजरात)
  सौराष्ट्रदेशे विशदेऽतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम्।
  भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये ।1।


  हे ज्योतिर्लिंग भारतामधीलच नाही तर सर्व पृथ्वी तलावरील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर गुजरात राज्यातील सौराष्ट क्षेत्रामध्ये स्थित आहे. या मंदिराची मान्यता अशी आहे की, जेव्हा चंद्रदेवला दक्ष प्रजापतीने शाप दिला होता तेव्हा चंद्रदेवाने याठिकाणी कठोर तप करून शापातून मुक्ती मिळवली होती. या शिवलिंगाची स्थापना स्वयं चंद्रदेवाने केली होती असे मानले जाते. विदेशी आक्रमणांमुळे हे मंदिर १७ वेळेस नष्ट झाले आहे.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग(श्रीशैल्यम,आंध्रप्रदेश)
  श्रीशैलशृंगे विबुधातिसंगे तुलाद्रितुंगेऽपि मुदा वसन्तम्।
  तमर्जुनं मल्लिकपूर्वमेकं नमामि संसारसमुद्रसेतुम्।2।


  मल्लिकार्जुन - हे ज्योतिर्लिंग आंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या काठावर श्रीशैल नावाच्या पर्वतावर स्थित आहे. या मंदिराचे महत्व महादेवाच्या कैलाश पर्वतासमान आहे. विविध धर्म शास्त्रांच्या मान्यतेनुसार या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व पापातून मुक्ती मिळते. एका पौराणिक कथेनुसार या पर्वतावर येउन महादेवाची पूजा केल्यास व्यक्तीला अश्वमेध यज्ञासमान पुण्य प्राप्त होते.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (उज्जैन, मध्यप्रदेश)
  अवन्तिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम्।
  अकालमृत्यो: परिरक्षणार्थं वन्दे महाकालमहासुरेशम्।3।


  हे ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशची धार्मिक राजधानी असलेल्या उज्जैन नगरामध्ये स्थित आहे. हे एकमात्र दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. या मंदिरात सकाळी केली जाणारी भस्मारती जगभरात प्रसिद्ध आहे.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  ममलेश्वर-ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग(इंदौर, मध्यप्रदेश)-
  कावेरिकानर्मदयो: पवित्रे समागमे सज्जनतारणाय।
  सदैव मान्धातृपुरे वसन्तमोंकारमीशं शिवमेकमीडे।4।


  हे ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशमध्ये ओंकारेश्वर येथे स्थित आहे. ज्या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग स्थित आहे, त्या ठिकाणाहून नर्मदा नदी वाहते आणि पर्वताच्या चारही बाजूने नदी वाहत असल्यामुळे या ठिकाणी ऊँ तयार होतो. ऊँ शब्दाची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मुखातून झाल्यामुळे कोणत्याही धार्मिक शास्त्र किंवा वेदाची सुरुवात  ऊँ शब्दाने होते.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  श्रीवैद्यनाथ ज्योतिर्लिंग(परळी,महाराष्ट्र)-
  पूर्वोत्तरे प्रज्वलिकानिधाने सदा वसन्तं गिरिजासमेतम्।
  सुरासुराराधितपादपद्मं श्रीवैद्यनाथं तमहं नमामि।5।


  परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. परळी येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  श्रीभीमाशंकर ज्योतिर्लिंग(डाकिनी, महाराष्ट्र)-
  यं डाकिनीशाकिनिकासमाजे निषेव्यमाणं पिशिताशनैश्च।
  सदैव भीमादिपदप्रसिद्धं तं शंकरं भक्तहितं नमामि।6।


  हे ज्योतीर्लिंग महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील सह्याद्री नावाच्या पर्वतावर स्थित आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराला मोटेश्वर महादेव नावानेसुद्धा ओळखले जाते. जो भक्त श्रद्धेने या मंदिरात ज्योतिर्लिंगाचे सकाळी सूर्योदयानंतर दर्शन घेतो त्याचे सात जन्माचे पाप नष्ट होतात आणि त्याच्यासाठी स्वर्गाचे मार्ग उघडले जातात.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  रामेश्वरम् ज्योतिर्लिंग(तमिळनाडु)-
  सुताम्रपर्णीजलराशियोगे निबध्य सेतुं विशिखैरसंख्यै:।
  श्रीरामचन्द्रेण समर्पितं तं रामेश्वराख्यं नियतं नमामि।7।


  हे ज्योतिर्लिंग तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरं याठिकाणी स्थित आहे. या ज्योतिर्लिंगाची स्थापना स्वतः श्रीरामाने केली होती. श्रीरामाने स्थापना केल्यामुळे या ज्योतिर्लिंगाला श्रीरामाचे नाव रामेश्वरम देण्यात आले.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  श्रीनागेश्वर ज्योतिर्लिंग(दारुकावन,महाराष्ट्र) -
  याम्ये सदंगे नगरेतिऽरम्ये विभूषितांगम् विविधैश्च भोगै:।
  सद्भक्तिमुक्तिप्रदमीशमेकं श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये।8।

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  श्रीविश्वनाथ ज्योतिर्लिंग(वाराणसी)-
  सानन्दमानन्दवने वसन्तमानन्दकन्दं हतपापवृन्दम्।
  वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये।9।


  हे ज्योतीर्लिंग उत्तरप्रदेश राज्यात स्थित आहे. काशीच्या सर्व धर्म स्थळांमध्ये सर्वात जास्त महत्व आहे. असे मानले जाते की, हे स्थान नेहमी राहील जर कधी पृथ्वीवर प्रलय जरी आला तरी या जागेच्या रक्षणासाठी महादेव हे स्थान आपल्या त्रिशुळावर धारण करतील आणि प्रलय समाप्त झाल्यानंतर काशी परत त्याच स्थानावर दिसले.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (नाशिक, महाराष्ट्र)
  सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरीतीरपवित्रदेशे।
  यद्दर्शनात् पातकमाशु नाशं प्रयाति तं त्रयम्बकमीशमीडे।10।


  हे ज्योतिर्लिंग गोदावरी नदीच्या काठावर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. या ज्योतिर्लिंगाच्या जवळ ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. याच पर्वतामधून गोदावरीचा उगम होतो. असे मानले जाते की गौतम ऋषि आणि गोदावरी नदीच्या  आग्रहामुळे महादेवाला या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्वरुपात राहावे लागले.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग
  महाद्रिपार्श्वे च तटे रमन्तं सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रैः।
  सुरासुरैर्यक्षमहोरगाद्यै: केदारमीशं शिवमेकमीडे।11।


  केदारनाथ स्थित ज्योतिर्लिंग महादेवाच्या १२ प्रमुख ज्योतिर्लिंगांमधील एक आहे. हे उत्तराखंड राज्यात स्थित आहे. केदारनाथ मंदिराचे वर्णन स्कंद व शिव पुराणात करण्यात आले आहे.

 • 12 Miraculous Jyotirling Mantra For Be Prosperous And Lucky

  श्री घृष्णेश्वर ज्योर्तिलिंग(एलोरा)-
  इलापुरे रम्यविशालकेऽस्मिन् समुल्लसन्तं च जगद्वरेण्यम्।
  वन्दे महोदारतरं स्वभावं घृष्णेश्वराख्यं शरणं प्रपद्ये ।12।
  ज्योतिर्मयद्वादशलिंगकानां शिवात्मनां प्रोक्तमिदं क्रमेण।
  स्तोत्रं पठित्वा मनुजोऽतिभक्त्या फलं तदालोक्य निजं भजेच्च॥

Trending