Home | Jeevan Mantra | Dharm | 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

PICS : मृत्युच्या 47 दिवसांनंतर यमलोकात पोहचतो आत्मा, या मार्गामध्ये घडते असेकाही

धर्म डेस्क | Update - Jan 09, 2014, 01:38 PM IST

मृत्यू हे एक असे सत्य आहे, जे कोणीही खोटं ठरवू शकत नाही.

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  मृत्यू हे एक असे सत्य आहे, जे कोणीही खोटं ठरवू शकत नाही. हिंदू धर्मामध्ये मृत्यू नंतर स्वर्ग-नरक अशा दोन मान्यता आहेत. पुराणानुसार जो मनुष्य चांगले कर्म करतो त्याचे प्राणहरण करण्यासाठी देवदूत येतात आणि त्याला स्वर्गामध्ये घेऊन जातात. जो मनुष्य वाईट कर्म करतो त्याचे प्राणहरण करण्यासाठी यमदूत येतात आणि त्याला नरकात घेऊन जातात, परंतु त्यापूर्वी त्या जीवात्म्याला यमलोकात नेण्यात येते आणि त्याठिकाणी यमदेव जीवात्म्याच्या पापानुसार त्याला शिक्षा देतात.

  मृत्युनंतर जीवात्मा यमलोकात कशा प्रकारे जातो याचे विस्तृत वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आले आहे. गरुड पुराणामध्ये हे ही सांगण्यात आले आहे की, कशा प्रकारे मनुष्याचा प्राण निघतो आणि कशा पद्धतीने तो प्राण पिंडदान प्राप्त करून प्रेतरूप धारण करतो.

  गरुड पुराणामधील रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  गरुड पुराणानुसार, ज्या मनुष्याचा मृत्यू जवळ आला असतो त्याला बोलण्याची खूप इच्छा असली तरी तो बोलू शकत नाही. शेवटच्या समयी त्याच्यामध्ये दिव्यदृष्टी उत्पन्न होते आणि तो संपूर्ण संसाराला एकरूप समजू लागतो. त्याचे सर्व इंद्रिय नष्ट होतात आणि तो जड अवस्थेमध्ये जातो, म्हणजे हालचाल करण्यात असमर्थ होतो.

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  त्यानंतर त्याच्या तोंडातून लाळ गळू लागते. पापी मनुष्याचा प्राण खालील मार्गाने निघतो. त्यावेळी दोन यमदूत येतात, ते खूप भयानक आणि क्रोधाने लाळ डोळे झालेले तसेच पाशदंड धारण केलेले नग्न अवस्थेमध्ये असतात. ते आपल्या दातांनी कट-कट असा आवाज करीत असतात.

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  यमदुताचे केस कावळ्यासारखे काळे, तोंड वाकडे-तिकडे आणि नखं त्यांचे शस्त्र असतात. अशा यमदेवाच्या यमदुतांना पाहून प्राणी भयभीत होऊन मलमूत्र त्याग करू लागतात. त्यावेळी शरीरामधून अंगूष्ठमात्र( अंगठ्या एवढा) जीव हा हा शब्द उच्चारात बाहेर पडतो आणि यमदूत त्याला पकडतात. यमदेवाचे दूत त्या जीवात्म्याच्या पकडून पाश त्याच्या गळ्यामध्ये बांधून त्याचक्षणी त्याला यमलोकाकडे घेऊन जाण्यासाठी निघतात. तो पापी जीवात्मा वाटेत थकला तरी यमदूत त्याला भयभीत करतात आणि नरकातील दुःख वारंवार ऐकवत राहतात.

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  यमदुताच्या त्या भयानक गोष्टी ऐकून पापात्मा मोठमोठ्याने रडू लागतो परंतु यमदूत त्याच्यावर थोडीसुद्धा दया करत नाहीत. त्यानंतर तो अंगठ्याएवढा जीवात्मा दुःखी होऊन आपण केलेल्या पापांचा विचार करत चालत राहतो. आगीसारख्या गरम वाळूवर आणि हवेमधून तो जीवात्मा चालू शकत नाही तसेह तहान-भुकेने व्याकून होतो. तेव्हा यमदूत त्याच्या पाठीवर चाबूक मारून त्याला पुढे घेऊन जातात. तो जीव ठिकठिकाणी पडतो, बेशुद्ध होतो आणि उठून पुन्हा चालू लागतो. अशाप्रकारे यमदूत अंधकाररूप मार्गावरून त्याला यमलोकात घेऊन जातात.

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  गरुड पुराणानुसार यमलोक ९९ योजन( वैदिक काळातील लांबी मोजण्याचे एकक. एक योजन ४ कोस म्हणजे १३-१६ कि.मी.) त्यानंतर यमदूत त्याला भयानक नरक यातना देतात. त्यामुळे तो जीवात्मा यम तसेच यम यातना पाहून थोड्याच वेळात यमदेवाच्या आज्ञेने आकाशमार्गाने पुन्हा घरी येतो.

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  घरामध्ये आल्यानंतर तो जीवात्मा शरीरात पुन्हा प्रवेश करण्याची इच्छा करतो, परंतु यमदुतांच्या पाश बंधनातून तो मुक्त होऊ शकत नाही. मुलगा जे पिंडदान करतो त्यामुळेही त्याची तृप्ती होत नाही कारण पापी मनुष्याला दान, श्रद्धांजलीद्वारे तृप्ती मिळत नाही. अशाप्रकारे तहान-भुकेने व्याकूळ झालेला तो जीव यमलोकात जातो.

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  त्यानंतर ज्या पापात्म्याचे मुलं पिंडदान करत नाहीत, ते प्रेत रुपामध्ये निर्जन वनामध्ये दुःखी मनाने फिरत राहतात. खूप काळ गेल्यानंतरही कर्म भोगावे लागते कारण जीवात्म्याला नरक यातना भोगल्याशिवाय मनुष्य शरीर प्राप्त होत नाही.गरुड पुराणानुसार मनुष्याच्या मृत्युनंतर १० दिवस पिंडदान अवश्य करावे. त्या पिंडदानाचे दररोज चार भाग होतात. त्यामधील दोन भाग पंचमहाभूत देहाला पुष्टी देणारे असतात, तिसरा भाग यमदुताचा आणि चौथा भाग प्रेत खाते. नवव्या दिवशी पिंडदान केल्याने प्रेताच शरीर तयार होते, दहाव्या दिवशी पिंडदान केल्याने त्या शरीरामध्ये चालण्याची शक्ती निर्माण होते.

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  गरुड पुराणानुसार शव जाळल्यानंतर पिंडातून हाताएवढे शरीर उत्पन्न होते. ते शरीर यमलोकात जाणार्‍या मार्गातील शुभ-अशुभ फळ भोगते. पहिल्या दिवशी पिंडदानाने प्रेताचे (डोकं), दुसर्‍या दिवशी गळा आणि खांदा, तिसर्‍या दिवशी हृदय, चौथ्या दिवशीच्या पिंडाने पाठ, पाचव्या दिवशी नाभी, सहाव्या आणि सातव्या दिवशी कंबर आणि त्याखालील भाग, आठव्या दिवशी पाय, नवव्या आणि दहाव्या दिवशी तहान-भूक उत्पन्न होते. असे पिंड शरीराला धारण करून तहान-भुकेने व्याकूळ झालेले प्रेत अकराव्या आणि बाराव्या दिवशी भोजन करते.

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  तेराव्या दिवशी यमदूत प्रेताला माकडासारखे पकडतात. त्यानंतर ते प्रेत तहान-भुकेने व्याकूळ होऊन एकटेच यमलोकात जाते. यमलोकात पोहचण्याचा मार्ग वैतरणी नदीला सोडून ८६००० योजन आहे. त्या मार्गावर प्रेत दररोज दोनशे योजन चालते. अशाप्रकारे ४७ दिवस निरंतर चालल्यानंतर प्रेत यमलोकात पोहचते.

 • 47 Days After Death The Soul Reaches Hell, This Is The Way

  अशाप्रकारे मार्गातील सोळा ठिकाण पार करत पापी जीव यमदेवाच्या घरी जातो. त्या सोळा ठिकाणांची नावे - सौम्य, सौरिपुर, नगेंद्रभवन, गंधर्व, शैलागम, क्रौंच, क्रूरपुर, विचित्रभवन, बह्वापाद, दु:खद, नानाक्रंदपुर, सुतप्तभवन, रौद्र, पयोवर्षण, शीतढ्य, बहुभीती.

Trending