Home | Jeevan Mantra | Dharm | 5 Easy Ways To Make Family Prosperous

दररोज शास्त्रातील हे 5 उपाय केल्यास कुटुंबावर राहील लक्ष्मीची कृपा

धर्म डेस्क | Update - Feb 14, 2014, 05:56 PM IST

जीवनात कोणत्याही रुपात आलेली वाईट वेळ संघर्षाचा काळ असतो.

 • 5 Easy Ways To Make Family Prosperous

  जीवनात कोणत्याही रुपात आलेली वाईट वेळ संघर्षाचा काळ असतो. ही वेळ कोणत्याही व्यक्तीला काही काळासाठी कमकुवत करते, परंतु योग्य व्यक्ती अशा वाईट काळामध्ये स्वतःमधील कमतरतेत सुधार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच गुणवान व्यक्ती कोणत्याही संकटामध्ये आत्मविश्वास, धैर्य कायम ठेवून जीवनात यशस्वी होतो.

  आर्थिक समस्यासुद्धा अशाच प्रकारचा वाईट काळ असतो. यामध्ये व्यक्ती कुटुंबातील आजार, बाधा, घटना, व्यवसायात तोटा किंवा अजीविकेवर कोणत्याही प्रकारच्या आलेल्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडतो. यामुळे कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडणे अवघड होऊन बसते.

  तुम्हालाही अशाच अडचणींचा सामना करावा लागत असेल तर यामधून बाहेर पडण्यासाठी शास्त्रामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही उपाय सांगण्यात आले आहेत.

  उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • 5 Easy Ways To Make Family Prosperous

  आज माघी पौर्णिमा असून लक्ष्मीपती भगवान श्रीविष्णूच्या उपासनेचा शुभ दिवस आहे. जाणून घ्या, आज आणि इतरही दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रातील कोणते उपाय करावेत.

  - सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात पाहिले तळहाताचे दर्शन घ्यावे. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हणजे हाताच्या आग्र भागावर लक्ष्मीचा वास मनाला गेला आहे.

  - एखाद्या तीर्थस्थळावर किंवा पवित्र जलाशयावर जाऊन अर्घ्य द्यावे. पवित्रतेमध्ये लक्ष्मीचा वास मनाला गेला आहे. यामुळे तीर्थस्थळावर गेल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

 • 5 Easy Ways To Make Family Prosperous

  तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. तुळशीला दररोज सकाळी पाणी घालावे आणि संध्याकाळी तुळशीचे पानं तोडू नयेत.

  खालील मंत्राचे स्मरण करून श्रीविष्णूला तुळशीची पानं किंवा मंजुळा अर्पण कराव्यात...
  तुलसी हेमरूपां च रत्नरूपां च मञ्जरीम्।
  भवमोक्षप्रदां तुभ्यं अर्पयामी हरिप्रियाम्।।

 • 5 Easy Ways To Make Family Prosperous

  - संध्याकाळी घराच्या मुख्य दाराजवळ आणि तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. संध्याकाळ देवी लक्ष्मीचा पृथ्वी भ्रमण काळ मनाला जातो.

  - सकाळी आणि संध्याकाळी अंगणात पाण्याचा सडा टाका. अशोकाच्या झाडाला पाणी घालावे आणि या झाडाचे एक पान गंगेच्या पाण्याचे स्वच्छ धवून देवघरात ठेवावे.

  - शुक्रवार, नवरात्री किंवा पौर्णिमेला लक्ष्मीचे हे उपाय केल्यास देवीची कृपा प्राप्त होते आणि घरातील कलह, दरिद्रता नष्ट होते.

Trending