आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 ठिकाणांवर घडल्या होत्या रावणाच्या जीवनातील सर्वात खास घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावणाला आपल्या काळातील सर्वात श्रेष्ठ विद्वान आणि तपस्वी मानले गेले. परंतु वास्तवामध्ये त्यांच्या वाईट कामांमुळे त्याची विद्वत्ताही त्याचे संरक्षण करु शकली नाही. अनेक ग्रंथांमध्ये रावणाचे वर्णन केले आहे. रामायणामध्ये काही अशा खास गोष्ट सांगितल्या आहेत जेथे रावणाने आपला जीवनकाळ घालवला होता. यांमधील सहा अशी ठिकाणे आहेत जेथे त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. आज आम्ही ज्या ठिकाणांवर रावणाने आपल्या जीवनातील महत्त्वाच्या काळ घालवला होता त्या ठिकाणांविषयी सांगणार आहोत...
महिष्मती नगर (वर्तमान- मध्यप्रदेशचे महेश्र्वर)
वाल्मीकि रामायणानुसार जेव्हा राक्षसराज रावणाने सर्व राजांना जिंकले तेव्हा तो महिष्मती नगर(वर्तमानात महेश्वर) चा राजा सहस्त्रबाहु अर्जुनाला जिंकण्याच्या इच्छेने त्यांच्या नगरात पोहोचला. त्यावेळी सहस्रबाहु अर्जुन आपल्या पत्नींसोबत नर्मदा नदीवर जलक्रीडा करत होता. रावणाला सहस्त्रबाहु सध्या येथे नसल्याचे समजल्यानंतर तो युध्द करण्याच्या इच्छेने तेथेच थांबुन राहिला. नर्मदेच्या जलधारा पाहुन रावणाने तेथेच महादेवाची पूजा करण्याचा विचार केला.

ज्या स्थानावर रावण महादेवाची पूजा करत होता तेथून काही अतंरावर अर्जुन आपल्या पत्नींसोबत जलक्रीडा करत होता. सहस्रबाहु अर्जुनाचा एकहजार भुजा (हात) होत्या. त्याने जलक्रीडा करताना नर्मदेचा प्रवाह थांबवला. ज्यामुळे नर्मदेचे पाणी किना-यांच्या वर चढू लागले. ज्या ठिकाणावर रावण महादेवाची पूजा करत होता, तेही नर्मदेच्या पाण्यात बुडाले. नर्मदेमध्ये अचानक आलेल्या या पुराचे कारण जाणुन घेण्यासाठी रावणाने आपले सैन्य पाठवले.

सैनिकांनी रावणाला पुर्ण गोष्ट सांगितली. रावणाने सहस्रबाहु अर्जुनाला युध्दासाठी बोलवले. नर्मदेच्या किना-यावर या दोघांमध्ये भीषण युद्ध झाले. शेवटी अर्जुनाने रावणाल बंदी बनवले. ही गोष्ट जेव्हा रावणाचे पितामह पुलस्त्यला कळाली तेव्हा ते अर्जुनाकडे रावणाला सोडण्याची विनंती करु लागले. सहस्त्रबाहु अर्जुनाने रावणाला सोडुन दिले आणि त्याच्यासोबत मैत्री केली.
रावणाच्या काही खास ठिकाणं आणि घटनांविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...