Home | Jeevan Mantra | Dharm | 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

PHOTOS : या 7 चमत्कारिक पूजा उपायांनी शनिदेव उघडतील नशिबाचे दार

धर्म डेस्क | Update - Nov 15, 2013, 01:24 PM IST

धर्म शास्त्रानुसार शनिदेव असे देवता आहेत, जे चांगले काम आणि कष्टाच्या जोरावर सुखी राहण्याची प्रेरणा देतात.

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  धर्म शास्त्रानुसार शनिदेव असे देवता आहेत, जे चांगले काम आणि कष्टाच्या जोरावर सुखी राहण्याची प्रेरणा देतात. महादेवाकडून मिळालेली न्यायाधीशाची जबाबदारी पार पडताना शनिदेवाला कडक रूप धारण करावे लागते. वाईट कर्म करणार्‍या व्यक्तीला दंड आणि चांगले कर्म करणार्‍या व्यक्तीला शुभ फळ देण्याचे काम शनिदेव करतात.

  शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी तसेच साडेसाती, शानिदोषाच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक दिवशी काही सोपे उपाय करणे आवश्यक आहे. हे उपाय केल्यास शनिदेवासोबतच इतर देवांची कृपा भक्तांवर राहते.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या देवाच्या उपासनेचे छोटे-छोटे उपाय करावेत....

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  शनीचे स्वामी आणि गुरु महादेव मानले जातात. सोमवारी महादेवाची पूजा करावी आणि खालील मंत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा.

  गंगोत्तरी वेग बलात्‌ समुद्धृतं
  सुवर्ण पात्रेण हिमांषु शीतलं
  सुनिर्मलाम्भो ह्यमृतोपमं
  जलं गृहाण काशीपति भक्त वत्सल।

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  मंगळवार आणि शनिवारी हनुमानाला शेंदूर लावावा. हनुमानाला असे देवता मानले जाते, ज्यांच्यावर शनीच्या वक्र दृष्टीचा कोणतही वाईट प्रभाव पडत नाही. खालील मंत्राचा जप अवश्य करावा.

  मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
  वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।।

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करून मोदकाचा नैवेद्य दाखवावा. पौराणिक मान्यतेनुसार श्रीगणेश श्रीकृष्णाचा अवतार असून आणि शनिदेव श्रीकृष्णाचे परम भक्त आहेत.

  खर्वंस्थूलतनुं गजेन्द्रवदनं लंबोदरसुन्दरं,
  प्रस्यन्दनमदगंधलुब्ध मधुपायालोलगण्डस्थलं,
  दन्ताघातविदारितारिरूधिरैः सिन्दूरशोभाकरं।
  वंदे शैलसुतासुतं गणपतिसिद्प्रदंकामदम्।।

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  गुरुवारी आपल्या गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा, कारण गुरु आणि वडीलधा-या मंडळींचा आदर शनिदेवाला प्रसन्न करतो. गुरु बृहस्पती मंत्राचा जप करावा.

  देवाना च ऋषिणां च गुरुं कांचसंनिभम्।
  बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्।।

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  शुक्रवारी दुर्गामातेची उपासना करावी तसेच खीर, दुधाचा नैवेद्य दाखवावा. देवी उपासना केल्याने सर्व ग्रहदोष दूर होण्यास मदत होते.
  या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता।
  नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल, काळे वस्त्र, काळे उडीद, काळे तीळ अर्पण करावेत.शनी मंत्राचा जप करावा.

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  रविवारी आणि दररोज पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करावे. पिंपळाच्या झाडाला दुध व काळे तीळ अर्पण करावेत.
  मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे।
  अग्रत: शिवरूपाय वृक्षराजाय ते नम:।।
  आयु: प्रजां धनं धान्यं सौभाग्यं सर्वसम्पदम्।
  देहि देव महावृक्ष त्वामहं शरणं गत:।।

  या सर्व उपायांसोबतच पुढे दिलेले उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतील...

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  1 - कोणत्याही शनिवारी किवा शनी अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी तयार केलेले जेवण पत्राळीमध्ये घेऊन त्यावर काळे तीळ टाकून पिंपळाची पूजा करावी आणि नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ते जेवण काळ्या गाईला खाऊ घालावे.

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  2 - काशाच्या भांड्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये आपला चेहरा पहावा, त्यानंतर तेल दान करावे. शनिदेवाला प्रसन्न करण्याचा हा अचूक आणि प्राचीन उपाय आहे.

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  3 - मोहरीच्या तेलामध्ये लोखंडाचे खिळे टाकून दान करावेत आणि पिंपळाच्या मुळ्यांवर तेल अर्पण करावे. या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

 • 7 Steps To Make Please Lord Shani And Be Prosperous

  4 - तेलाचा पराठा तयार करून त्यावर एखादा गोड पदार्थ ठेवावा, त्यानंतर गाईच्या वासराला हे अन्न खाऊ घालावे. हा शनिदेवाला प्रसन्न करण्याचा छोटा आणि अचूक उपाय आहे.

Trending