आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Ways To Reach Top Of Success Of Hindu Scripture Mahabharat

यशाचे शिखर गाठण्‍यासाठी महाभारतात सांगितली आहे ही सप्‍तपदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशस्‍वी होण्‍यासाठी प्रत्‍येक व्‍यक्ति प्रयत्‍न करत असतो. यशस्‍वी होण्‍यासाठी फक्‍त प्रयत्‍न करून भागत नाही. बरेच लोक खूप मेहनत घेतात. कष्‍ट करण्‍याची तयारी ठेवतात. मात्र ते यशस्‍वी होत नाहीत. असे का घडते ? अपयशाची बरीच कारण्‍ो सांगितली जातात. काही लोक स्‍वत:च्‍या नशिबाला दोष देतात. यापैकी महत्‍वाच्‍या करणांचा धांडोळा आज आपण घेणार आहोत. एखादी व्‍यक्ति जी कृती करत आहे, त्‍यानूसार जर त्‍याचे विचार नसतील, जे काम तो करत आहे त्‍याबद्दल उदासीनता असेल तर अपयश आल्‍याशिवाय राहणार नाही. यश मिळवण्‍यासाठी तुम्‍ही जे काम करता त्‍या कामबद्दल तुम्‍हाला आवड आसायला हवी. कामात सातत्‍य असायला हावे. सातत्‍य नसेल तर प्रगती होणे शक्‍य नाही. जर तुमचे लक्ष्‍य योग्‍य असेल तर यश हमखास मिळते. प्रयत्‍न केल्‍यानंतरही यश मिळत नसेल तर, मग मात्र काही करण्‍याची इच्‍छा राहात नाही. असे झाल्‍यानंतर काय करायला हवे याची सात सुत्रे महाभारतामध्‍ये सांगण्‍यात आली आहेत.
अपयशाची कारणे महाभारत या धर्मग्रथांत देण्‍यात आली आहेत. महाभारतामध्‍ये सांगितलेल्‍या या सात सुत्रांचा योग्‍य उपयोग केल्‍यानंतर सर्वसाधारण व्‍यक्तिही यशाचे शिखर गाठू शकतो. काय सांगितले आहे महाभारतामध्‍ये जाणून घ्‍या पुढील श्लोकाच्‍या माध्‍यमातून.
उत्थानं संयमो दाक्ष्यमप्रमादो धृति: स्मृति:।
समीक्ष्य च समारम्भो विद्धि मूलं भवस्य तु।।
या श्लोकामध्‍ये जीवन, कर्म, विचार आणि व्‍यवहारासंदर्भात सात सुत्रे सांगण्‍यात आली आहेत.
परिश्रम-
लवकर यश मिळवण्‍यासाठी काही लोक मधला मार्ग आवलंबतात. मात्र त्‍यांना आपेक्षीत यश मिळत नसल्‍यामुळे असे लोक निराश होतात. शाश्‍वत यश मिळवण्‍यासाठी संकल्‍प करण्‍याबरोबरच परिश्रम करण्‍याची गरज असते.
पुढील स्‍लाईडवर वाचा काय आहेत सुत्रे...