आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Interesting Facts About Lord Shiv According Ramayan

देवांचा देव महादेवामध्येही आहेत या 8 कमतरता, जाणुन घ्या रामायणातील काही रंजक गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेव माहायोगीच्या स्वरुपात पूजनीय आहे. महादेवाच्या योग स्वरुपालाच संसाराच्या सुख-दुख:चे कारण मानले जाते. महादेव रुद्र अवतार धारण करुन वाईट विचार, वृत्ती यांना भस्म करुन जगाच्या हितासाठी मगंलमय वातावरण निर्माण करतात. अशा प्रकारे विनाशकारी आणि मगंलमय अशा दोन्ही रुपात महादेवाच्या अपार शक्तीचे दर्शन होते. सांसारीक दृष्टीकोनातून कोणी कितीही गुणी असला तरी त्याच्यामध्ये एखादीतरी उणीव, कमतरता असते. तुम्हाला माहिती आहे का, हीच बाब महादेवालाही लागू होते. धर्मग्रथांमध्ये महादेवामध्ये असलेलेल्या काही उणीवांचा उल्लेख आढळून येतो.
खरतर महादेवाच्या अपरंमपार शक्तीसमोर या उणीवा शुल्लक दिसतात किंवा महादेवाचे हे अवगुण जगासाठी ज्ञान आणि गुणांचा खजिना बनुन मंगलमय ठरतात.
हिंदू धर्मग्रंथ रामचारितमानसमध्ये महादेवाच्या अशाच 8 गुणांचा उल्लेख आहे, जे महादेवाचा निराळेपणा स्पष्ट करतात आणि शिव-भक्तीचा आनंद आणखी वाढवतात.
मर्यादेची शिकवण देणा-या रामचारितमानसमध्ये शिव-पार्वती विवाह प्रसंगी माहादेवाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या पार्वतीला विष्णुशी लग्न करण्यासाठी समजवताना ऋषींनी या उणीवांचा उल्लेख केला आहे.
तेहि कें बचन मानि बिस्वासा। तुम्ह चाहहु पति सहज उदासा॥
निर्गुन निलज कुबेष कपाली। अकुल अगेह दिगंबर ब्याली ||
अर्थ : ऋषीगण पार्वतीला सागंत आहेत की, 'नारदमुनींचे म्हणने ऐकुन तुला अशा पतीची इच्छा आहे, जो (शिव) स्वभावाने उदासीन, गुणहीण, खराब पोशाख परिधान करणारा, कवट्यांच्या हार-माळा घालणारा, कुळ, घरदार नसणारा, उघडा आणि शरिरावर साप गुंडाळणारा पती निवडत आहेस.'
याचे अचुक उत्तर पार्वतीने पुढीलप्रमाणे दिले
महादेव अवगुन भवन बिष्नु सकल गुन धाम।
जेहि कर मनु रम जाहि सन तेहि तेही सन काम॥
मला मान्य आहे की, महादेव अवगुणांचे भवन आणि विष्णु सद्गुणांचे धाम आहेत, पण ज्याचे मन ज्याच्यात रममाण झाले, त्याच्यासाठी तर तोच सर्वकाही आहे.