Home | Jeevan Mantra | Dharm | 21 Names Of lord Hanuman

साडेसाती आणि ढय्याने त्रस्त असाल तर शनिवारी करा हा 1 सोपा उपाय

रिलिजन डेस्क | Update - Jul 21, 2018, 10:36 AM IST

शनिदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी शनिदेव तसेच हनुमान यांची एकत्र पूजा करणे शुभ राहते.

 • 21 Names Of lord Hanuman

  शनिदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी शनिदेव तसेच हनुमान यांची एकत्र पूजा करणे शुभ राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार प्रत्येक शनिवारी हनुमानाच्या 21 नावांचा उच्चार करून त्यांची पूजा केल्यास शनिदोषाचा प्रभाव कमी होऊन दुर्भाग्य दूर होऊ शकते. ज्या लोकांवर शनीच्या साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव असेल त्यांनी हा उपाय प्रत्येक शनिवारी अवश्य करावा...


  1. अंजनीसुत- अंजनीचे पुत्र
  2. महावीर- वीरांचे वीर
  3. हनूमत- हनुवटीवर चिन्ह
  4. मारुतात्मज- पवन देवताचे पुत्र
  5. फाल्गुनसुख- अर्जुनाचे मित्र
  6. कपीश्वर- वानरांचे राजा
  7. महाकाय- विशाल शरीर असलेले
  8. कपिसेनानायक- वानरांचे सेनापती
  9. महाबल- परम शक्तिशाली
  10. रामदूत- भगवान श्रीरामाचे दूत
  11. केसरीसुत- केसरी पुत्र
  12. सीताशोक विनाशक- देवी सीतेचा शोक दूर करणारे
  13. अन्जनागर्भसम्भूता- अंजनीच्या गर्भातून उत्पन्न झालेले
  14. लक्ष्मणप्राणदाता- लक्ष्मणाचे प्राण वाचवणारे
  15 वज्रकाया- मजबूत शरीर असलेले
  16. चिरंजीवि- अमर
  17 रामभक्त- भगवान श्रीरामाचे परम भक्त
  18 कांचनाभ- सोनेरी रंग असलेले
  19. महातपसी- तपश्चर्या करणारे
  20. सुग्रीव सचिव- सुग्रीवाचे सहायक
  21. दैत्यकुलान्तक- राक्षसांचा अंत करणारे

Trending