आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितरांची तिथी आहे अमावास्या : नदीमध्ये टाका काळे तीळ, पितरांच्या आशीर्वादाने मिळेल यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 13 जुलैला अमावस्या तिथी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अमावास्या तिथी पितरांची मानण्यात आली आहे. यामुळे या दिवशी पितरांच्या आत्मा शांतीसाठी श्राद्ध, तर्पण करण्याचे विधान आहे. यामुळे दिवशी काही खास उपाय केल्यास पितृ दोष दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


1. अमावस्येच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीमध्ये काळे तीळ टाकून तर्पण करावे. यामुळे पितृगण प्रसन्न होतात.


2. पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास मानण्यात आला आहे. अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करावे आणि गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा.


3. अमावास्येला एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलावून भोजन सामग्री दान करावी.


4. अमावास्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून गायीला चारा टाकावा. यामुळेसुद्धा पितृ प्रसन्न आणि तृत्प होतात.


5. अमावास्येला गायीच्या शेणाच्या गोवरीवर तूप-गूळ टाकून धूप द्यावी आणि पितृ देवताभ्यो अर्पणमस्तु म्हणावे.


6. अमावस्येच्या दिवशी कच्चे दूध, तीळ, तांदूळ एकत्र करून नदीमध्ये प्रवाहित करावेत. हा उपाय सूर्योदयाच्या वेळी केल्यास शुभ राहील.


पुढील स्लाईड्सवर पाहा, व्हिडीओ...

बातम्या आणखी आहेत...