आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्णाचे हे 4 मंत्र दूर करू शकतात तुमच्या अडचणी, 13 जूनपर्यंत रोज जप करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अधिक मास सुरु असून, हा 13 जूनपर्यंत राहील. धर्म ग्रंथानुसार या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्वप्रकारचे सुख प्राप्त होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार अधिक मासात भगवान श्रीकृष्णाच्या काही खास मंत्रांचा जप केल्यास पैसा, सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, भगवान श्रीकृष्णाचे काही खास मंत्र...


मंत्र 1 - कृं कृष्णाय नमः
हा भगवान श्रीकृष्णाचा मूलमंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता वाढते. यासोबतच कुटुंबात सुख-शांती कायम राहते.


मंत्र 2 - ऊं श्रीं नमः श्रीकृष्णाय परिपूर्णतमाय स्वाहा
हा भगवान श्रीकृष्णाचा सप्तदशाक्षर मंत्र आहे. अधिक मासात या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक प्रकारच्या अडचणीतून मुक्ती मिळून जीवनात शांती कायम राहते.


मंत्र 3 - क्लीं ग्लौं क्लीं श्यामलांगाय नमः
हा तंत्रशी संबंधित मंत्र आहे. भगवान श्रीकृष्णाच्या या मंत्राचा जप केल्याने धनलाभाचे योग जुळून येतात. यासोबतच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.


मंत्र 4 - ऊं नमो भगवते श्रीगोविन्दाय
पती-पत्नीमध्ये वाद किंवा वैवाहिज जीवनात समस्या असल्यास रोज या मंत्राचा जप करावा.


अशाप्रकारे करावा या मंत्राचा जप 
अधिक मासात रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या माळेने या मंत्रांचा जप करावा. कमीत कमी 5 माळी जप करावा. जप करताना समोर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो असल्यास जास्त उत्तम राहील.

बातम्या आणखी आहेत...