आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फ कॉन्फिडन्स कमी किंवा शत्रू वरचढ असल्यास रोज करा या स्तोत्रचा पाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाल्मिकी रामायणातील युद्ध कांड (लंका कांड)मधील एका कथेनुसार, प्रभू श्रीराम यांनी युद्धामध्ये अनेक राक्षसांचा वध केल्यानंतर अचानक रावण युद्ध करण्यासाठी समोर आला. श्रीराम हे दीर्घकाळापासून युद्ध करत असल्यामुळे काहीसे थकले होते. रावण आवेशात येऊन युद्धासाठी सज्ज होता. तेव्हा महादेवाचे शिष्य अगस्त्य ऋषी तेथे आले आणि त्यांनी प्रभू श्रीरामाला तीन वेळेस आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ करून युद्ध करण्यास सांगितले. प्रभू श्रीराम यांनी अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे केले. या स्तोत्राच्या प्रभावाने त्यांचा सर्व थकवा दूर झाला. मन आत्मविश्वासाने भरून आले. त्याच युद्धामध्ये प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध केला.


ज्योतिषमध्ये सूर्य ग्रहाला आत्मा कारक मानले गेले आहे. सूर्य कमजोर असल्यास व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. शरीर थकून जाते. व्यक्तीमध्ये संघर्ष करण्याची इच्छाशक्ती राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीला महत्त्व दिले जात नाही. या समस्येतून मुक्त होण्यासाठी सूर्यदेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला जातो.


अशाप्रकारे करा आदित्य हृदय स्तोत्रचा पाठ
1 . सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे.

2 . स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या कलशाने अर्घ्य द्यावे.

3 . शक्य असल्यास तेथेच कुशच्या आसनावर किंवा घरात देवासमोर बसावे.

4 . सूर्यदेवाचे स्मरण करावे. ऊँ आदित्याय नमः मंत्राचा जप करावा.

5 . त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्रचा पाठ करावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, आदित्य हृदय स्तोत्र...

बातम्या आणखी आहेत...