Home | Jeevan Mantra | Dharm | ashadhi ekadashi 2018 and warkari tulasi importance

या सर्व गोष्टींमुळे वारकरी संप्रदायात तुळस आणि तुळशी माळेचे खास महत्त्व

रिलिजन डेस्क | Update - Jul 22, 2018, 12:02 AM IST

आषाढी एकादशी (23 जुलै, सोमवार) च्या निमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरा

 • ashadhi ekadashi 2018 and warkari tulasi importance

  आषाढी एकादशी (23 जुलै, सोमवार) च्या निमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होतात. वारकरी संप्रदायात पंढरपूराला आपले माहेर म्हटले जाते आणि विठ्ठ्ल-रुख्मिणीला आपले आई-वडील. वारकरी संप्रदायात आणखी एका गोष्टीला फार महत्त्व आहे ते म्हणजे तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावन. आज आम्ही तुम्हाला वारकरी संप्रदायात तुळशीला एवढे का महत्त्व आहे याविषयी खास माहिती देत आहोत.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वारकरी संप्रदायात तुळशीचे महत्त्व...

 • ashadhi ekadashi 2018 and warkari tulasi importance

  तुळशीचे रोप सात्विकतेचे प्रतीक आहे. नियमित तुळशीच्या दर्शनाने सुख-समृद्धी प्राप्त होते. तुळशीचा स्पर्श प्रचंड ऊर्जा देतो. ज्या ठिकाणी तुळस असते तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते. तुळशीमुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहते. तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही. आयुष्यतील कर्तव्य कर्म करताना भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ धारण करणे आवश्यक आहे. 
  वारकरी दीक्षा घेताना गळ्यात घातलेली माळ काही कारणामुळे तुटल्यास ती पुन्हा गुंफून गळ्यात घालेपर्यंत वारकऱ्याला अन्न सेवन करता येत नाही. 


  पुढे वाचा, संत नामदेवांनी तुळशी संदर्भात सांगितलेला महिमा...

 • ashadhi ekadashi 2018 and warkari tulasi importance

  तुलसीविण ज्याचे घर। तें तंव जाणावें अघोर।
  तेथ वसती यम किंकर। आज्ञा आहे म्हणोनि।।
  तुलसीवृंदावन ज्याचे घरी । त्यासी प्रसन्न श्रीहरी।
  तुलसीवृंदावना जे करिती प्रदक्षिणा। जन्ममरण त्यांना नाही नामा म्हणे।।


  अर्थ - ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावे, तेथे यमदूतांचे वास्तव्य असते. परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्या लोकांच्या घरात तुळशी वृंदावन आहे त्यांच्यावर श्रीहरी प्रसन्न होतात. जो व्यक्ती तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालून श्रीहरीचे स्मरण करतो तो जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो.


  या सर्व गोष्टींमुळे वारकरी संप्रदायात तुळशीचे खास महत्त्व आहे.

Trending